आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथविधी:आरोग्य शिबिरे, व्याख्यानांतून असोसिएशन करणार जनजागृती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक आजारात सर्वात पहिली आणि महत्त्वाची भूमिका फिजिशियन्सची असते. आजार झाल्यावर त्यावर उपचार करण्यात जितके निष्णात झाले पाहिजे त्यापेक्षा अधिक आजार होऊ नये म्हणून पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे फिजिशियन संघटनेचा राज्य अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना वर्षभरात विविध आरोग्य शिबिरे आणि जनजागृतिपर व्याख्यानमाला विविध ठिकाणी घेण्याचा मानस असल्याचे डॉ. सुरेंद्र जयस्वाल यांनी सांगितले.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन या विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटना राज्य अध्यक्षपदी विराजमान होणारे डॉ. सुरेंद्र जयस्वाल हे पहिलेच डॉक्टर आहेत. पुण्यात ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या फिजिशियन संघटनेच्या राज्यस्तरीय परिषदेत डॉ. जायस्वाल यांचा पदग्रहण आणि शपथविधी होणार आहे.

परिषदेला राज्यभरातून दीड हजारावर तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये नेफ्रॉलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, डायबेटॉलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, हिमॅटॉलॉजिस्ट आदी विविध विषयांतील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या वेळी विविध विषयांतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. प्रत्येक शाखेत उपलब्ध झालेले अत्याधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान, उपचार पद्धती, क्रिटिकल केअर यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्यक्ष ज्ञानसत्रानंतर त्यावर चर्चा आणि प्रश्नोत्तरेही होतात. तसेच शंकांचे निरसन केले जाते. परिषदेच्या शेवटच्या दिवशी पुढील वर्षासाठी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा होऊन त्यात डॉ. जायस्वाल यांचा शपथविधी होईल.

बातम्या आणखी आहेत...