आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठांची सेवा ही एक विशेष जबाबदारी आहे. भविष्यातील समाजाची गरज ओळखत आस्था फाउंडेशन, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि सावित्रीबाई फुले एकात्म विकास मंडळाने ६ वर्षांपूर्वी मोफत वार्धक्य सेवा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात केली. अभ्यासक्रमाच्या ११ व्या बॅचचा प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला. आतापर्यंत १२५ जणांनी हे प्रशिक्षण घेतले आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनजित ग्रुप ऑफ बिझनेसचे राजेंद्रसिंग राजपाल, वास्तुविशारद अजय कुलकर्णी, आस्थाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य उपस्थित होते. राजपाल म्हणाले, वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हा कोर्स खरोखरच आवश्यक आहे. संस्थेचे कोषाध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी आभार मानले. योगिता सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.
कोर्समध्ये हे विषय { जेरिअॅट्रिक किंवा जेरिअँटॅालॅाजी या संकल्पनेची माहिती. { बेसिक जेरिअॅट्रिक केअर { ज्येष्ठ व्यक्तींचे पुनर्वसन { संवाद, समुपदेशन व मार्गदर्शन.
मानसिक-भावनिक आधार वृद्धांना आरोग्यसेवेसोबत एकाकीपणा घालवणे, त्यांना बोलते करणे, मानसिक व भावनिक आधार देणे हे सर्व या कोर्समध्ये अपेक्षित आहे. अनेक वृद्धाश्रमांना शैक्षणिक सहली, संवेदनशील उपक्रम घेतले जातात.
दाेन लाखांचा खर्च चार महिन्यांचा हा अभ्यासक्रम विनामूल्य शिकवला जातो. यासाठी प्रत्येक बॅचमागे येणारा २ लाख रुपयांचा खर्च आस्था फाउंडेशन करते. ज्येष्ठांना आधार आणि गरजूंना रोजगार मिळतो. ही मराठवाड्यातील पहिलीच संस्था आहे. - डॉ. नरेंद्र वैद्य, अध्यक्ष, आस्था फाउंडेशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.