आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:सिल्लोड तालुकल्यातील चारनेर वाडीत दवंडी, निर्जंतुकीकरण, सुरक्षित अंतराने आतापर्यंत एकही कोरोना बाधित नाही

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकामेकांच्या घरी जाऊ नका, घोळक्या घोळक्यानी चौका मंदी बसू नका

"ऐका हो ऐका गावकरी मंडळी, एकामेकांच्या घरी जाऊ नका आणि घोळक्या घोळक्यांनी चौका मंदी बसू नका. मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका ' अशी दवंडी रात्रीच्या वेळी गावभर देत, सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर आणि निर्जंतुकीकरण अशी त्रिसूत्री पाळून सिल्लोड तालुक्यातील चारनेर वाडी येथे आतापर्यंत सध्याच्या घडीला एकही कोरोनाबाधित नसल्याचे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी डॉ.सुनील भोकरे यांनी दिली. तर आपलेे गाव कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ग्रामसेवक एस.बी. शिंदे यांनी सांगितले असून, नियमांचे पालन करत एक आदर्श इतर गावांसमोर ठेवण्यात आला आहे.

राज्यभरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. शहरातसह ग्रामीण भागात या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. मागील वेळी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लोक ग्रामीण भागात जात होते. परंतु आता ग्रामीण भाग देखील कोरोनाच्या विळख्यात आला आहे. तेंव्हा गाव सुरक्षित रहावी यासाठी ग्रामदक्षता समितीच्या माध्यमातून कोरोनामुक्त गाव कसे राहिल. ज्या गावात प्रादुर्भाव आहे. ते गाव कोरोनामुक्त कसे करता येेईल. जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. औरंगाबाद जिल्हयातील सिल्लोड तालुक्यातील चारनेर वाडी हे गाव २५ किलोमीटर अंतरावर आहे. चारनेरची लोकसंख्या साडेतीन हजार तर बाराशे लोकवसती वाडी गावात आहे. या गावात आजघडीला एकही कोरोनाबाधित नाही. गावातील लोक हे छोट्या व्यापार आणि शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याने गावातील लोकांमधील गैरसमज प्रथम दूर करण्यात आले. गावची सभा घेवून गावकऱ्यांना काय वाटत हे समजून घेत अफवांवर विश्वास ठेवू नका. यासाठी गावात दवंडी देण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. वेळावेळी निर्जंतुकीकरण, फवारणी आणि स्वच्छतेवर भर देण्यात येतो. गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सरपंच, उपसरपंचांची मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाहेरल्याच्या गावच्या सीमेवर अडवले जाते

दरम्यान गावात कोरोना बाधित होवू नयेत. यासाठी बाहेर गावाहून गावात येणाऱ्या व्यक्तीस गावच्या सीमेवर वेशीबाहेरच अडवण्यात येते. त्याची तपासणी करुन त्याला शेतात क्वॉरंटाईन ठेवले जाते. यामुळे बाहेरच्या लोकांचा गावातल्या लोकांशी संबंध येत नसल्याचेही शिंदे यांनी सांगितले. तर सरपंच रविदसिंग बिलवाळ देखील जनजागृती करतात. गावातील सर्व अबाळवृद्धांनी त्यांचा आहार पोषणयुक्त असावा, कोरोनाची लक्षण, त्यावर उपाययोजना याची सर्व माहिती गावकऱ्यांना देण्यात येत आली आहे.

बातम्या आणखी आहेत...