आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 बाय 40 फुटांचे व्यासपीठ:नड्डांच्या सभेसाठी प्रत्येक वॉर्डातून किमान 200 कार्यकर्ते आणणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा लोकसभा निवडणुकीचा बिगुल औरंगाबादेत सोमवारी (२ जानेवारी) आयोजित सभेच्या माध्यमातून फुंकणार आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी सभेच्या तयारीची पाहणी केली. सभेसाठी ८० बाय ४० फुटांचे व्यासपीठ बनवण्यात आले आहे. प्रत्येक वॉर्डातून किमान दोनशे कार्यकर्ते आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीसाठी इच्छुक पदाधिकारीही कामाला लागले आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या सभेला २५ हजारांचा जनसमुदाय बसेल अशी व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ. कराड यांनी पत्रकारांना सांगितले.

असा आहे वाहतुकीत बदल सभेमुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारी ४ ते रात्री १० वाजेदरम्यान मिल कॉर्नर ते खडकेश्वर टी पॉइंटमार्गे महात्मा फुले चौक रस्ता तसेच आयटीआय ते खडकेश्वर, जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग, ज्युबिली पार्क व आशा ऑप्टिकल्सपासून ते मराठवाडा सांस्कृतिक मैदानापर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...