आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन सभा:निसर्ग कॉलनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी निसर्ग कॉलनी, भावसिंगपूरा येथे सामूहिक वंदनेचा कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या शहर सचिव शीतल बनकर, अनिल खरात उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अँड. दिलीप झोडगे हे होते.

कार्यक्रमाची सुरवात बुद्ध वंदनेने झाली या दरम्यान प्रा. कोंडबा हटकर, अशोक खरात, वंदना भीसे आदि मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. सत्‍यशीला सोनोने, राहुल हिवाळे यांनी अभिवादनपर गीत गायले.

अभिवादन सभेत प्रमुख पाहुण्‍यांच्‍या हस्‍ते निसर्ग कॉलनीतील आर्यन जाधव हा बॉक्सिंग स्पर्धेत विभागीय स्तरावर दुसरा आल्याबद्दल तसेच जागृती जाधवने जिमनॅस्टिक स्पर्धेत राज्य स्तरावर सहभाग नोंदवल्या बद्दल या दोन्ही विध्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. अभिवादन सभेत कॉलनीतील सर्व बौध्‍द उपासक, उपासिका शुभ्र वस्‍त्र परिधान करुन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हनुमंत पाईक यांनी केले तर आभार डॉ. संघरत्न गवई यांनी व्यक्त केले. अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम जोगदंड, प्रा. रामेश्वर वरशीळ, धर्मानंद जाधव, संदीप गव्हांदे, ज्ञानेश्वर जाधव, मिलिंद आठवले, एकनाथ मानवते, राहुल हिवाळ, अंकुश वाकोडे आदिंनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...