आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल कमी भरले म्हणत मारहाण:​​आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; पंपावरील कर्मचाऱ्यावर चाकूने केले होते वार

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल कमी का भरले म्हणत कर्मचाऱ्याला गंभीर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी सोहेल मोहम्मद शरीफ खान (२०, रा. शिवाजीनगर) याचा अटकपूर्व जामीन औरंगाबाद सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. शहरातील जागृत पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक शेख हबीबुद्दीन शेख हमीतुद्दीन (३६, रा. रशिदपुरा) यांनी आरोपीविरोधात तक्रार दिली होती.

शिवीगाळ करत मारहाण

तक्रारीनुसार, ४ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता पेट्रोलल पंचावरील कर्मचारी योगेश छापुले (वय २५, रा. पुंडलिकनगर) याला आरोपीने चाकू तसेच फायटरने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला पेट्रोल कमी टाकले म्हणत आरोपीने कर्मचाऱ्याशी वाद घालण्‍यास सुरुवात केली. त्‍यावेळी योगेशने त्‍याला समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, आरोपीने शिवीगाळ करून आपल्या साथीदारांना तेथे बोलावले. काही वेळाने आरोपी व त्‍याच्‍या साथीदारांनी योगेशला शिवीगाळ करुन मारहाण केली. पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी योगेशला सोडवले.

आईचा विनयभंग

मारहाण झाल्यानंतर योगेशने याबाबत घरी सांगितले. घटनेची माहिती मिळताच योगेशचे आई-वडील, भाऊ व इतर दोन तरुण पेट्रोलपंपावर आले. पावणे 10 वाजेच्‍या सुमारास पुन्‍हा 10 ते 15 व्‍यक्ती पेट्रोलपंपावर आले. त्‍यांनी पुन्‍हा योगेशसह त्‍याच्‍या नातेवाईकांना चाकू, फायटर व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले. तसेच योगेशच्‍या आईचा विनयभंग केला. प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

पोलिसांनी आरोपी शेख अफसर आणि सुलेमान पटेल या दोघांना अटक करून त्‍यांची न्‍यायालयीन कोठडीत केली. आरोपी सोहेल मोहम्मद याने अटक होऊ नये, यासाठी जामीन अर्ज सादर केला असता सत्र न्‍यायालयाने तो नांमजूर केला. प्रकरणात सहायक सरकारी लोकाभियुक्त ए. बी. येगावकर यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...