आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीचे पथक कार्यक्रम निश्चित करेल:औरंगाबादला जी-20 परिषद होणार की नाही, याविषयी सध्या तरी अधिकृत माहिती नाही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादला जी-२०ची परिषद होणार की नाही याविषयी माझ्याकडे सध्या तरी कोणतीही अधिकृत माहिती नाही, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (६ जानेवारी) सांगितले. दिल्लीतून २६, २७ जानेवारीला येणारे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे पथक जी-२० चा कार्यक्रम निश्चित करेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

गेल्या सहा महिन्यांपासून जी-२० परिषदेची चर्चा सुरू आहे. शहरातील विविध कामांसाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपये दिले आहेत. त्याचा तपशील पांडेय यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. परदेशी पाहुणे नेमके कधी येणार आणि ते औरंगाबादेतील वास्तव्यात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर, किती तास चर्चा करणार, कोणत्या ऐतिहासिक, पर्यटन स्थळांना भेटी देणार, असा प्रश्न विचारला. त्यावर पांडेय म्हणाले की, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती अजून माझ्याकडे आलेली नाही. या पूर्वी जी-२० चे पाहुणे १४, १५ फेब्रुवारीला येतील, असे सांगितले जात होते. आता ते बहुधा २५, २६ फेब्रुवारी रोजी औरंगाबादेत असू शकतील.

पण ते नेमके काय करणार, कुठे जाणार हे सांगता येणार नाही. अशा परिषदांमध्ये पाहुणेच ऐनवेळी काही निर्णय घेत असतात. कदाचित पाहुण्यांचे एक पथक वेरूळ तर दुसरे गुलमंडीवर असू शकते. त्यांच्या दौऱ्याच्या दिवशी ऐतिहासिक स्थळे सामान्यांंसाठी बंद असतील, तशी अधिसूचना िनघेल. आम्ही त्यांनी हेरिटेज वाॅकमध्ये सहभागी व्हा आणि वेरूळ महोत्सवाचा आनंद घ्या, अशा आॅफर देण्याची तयारी केली आहे. वाहतूक, सुरक्षेसाठी समित्या स्थापन केल्या आहेत.

असा निधी, अशी कामे राज्य शासनाने मनपाला ५० कोटींचा निधी दिला. त्यातील २० कोटी रुपये चिकलठाणा विमानतळ ते हर्सूल टी पाॅइंट म्हणजे जळगाव रस्त्यासाठी आहेत. भिंती, उड्डाणपूल रंगरंगोटी, वीज दिवे ५ कोटी, व्हर्टिकल गार्डन, कारंजे आणि रोषणाईसाठी ५ कोटी, वाहतूक बेटे, लेफ्ट टर्निंगसाठी ५ कोटी असा खर्च अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...