आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे अपघात:पूर्णा येथेे रेल्वे इंजिन विद्युत डीपीला धडकले, सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

परभणीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पूर्णा येथील रेल्वे स्थानकावर सोमवारी(दि.11) दुपारी साडेचारच्या सुमारास एक डिझेल इंजिन रेल्वे रूळावरून घसरून डीपीस जावून धडकले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

मालवाहू गाडीचे डिझेल इंजिन स्थानकावरून  रूळ चेेंज करण्याकरता निघाले असतांना अचानक ते रेल्वेरूळावरू घसरले आणि वेगाने पुढे जावून प्लॉटफॉर्मच्या बाजूच्या विजेच्या डीपीस जावून  धडकले. सुदैवाने कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही किंवा जीवीतहानी झाली नाही. याप्रकरणानंतर रेल्वे अधिकारी, कर्मचा-यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अन् ते इंजिन तेथून हालविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. घटनामागील कारण सायंकाळी उशिरापर्यंत कळू शकले नाही. दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या अधिका-यांनी अधिकृत असा तपशील ही दिला नाही.

बातम्या आणखी आहेत...