आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:पोलिसांना विश्रांती मिळावी म्हणून लोकप्रतिनिधींची चेक पोस्टवर, तर सरकारी रुग्णालयात खासगी डॉक्टरांची सेवा

वैजापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये वैजापुरात कार्यकर्त्यांनी राबवला अनोखा उपक्रम

कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जनतेच्या आरोग्याची काळजी घेत गेल्या ४५ दिवसांपासून दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना दोन दिवस विश्रांती मिळावी म्हणून वैजापुरात लाेकप्रतिनिधींनी अनोखा उपक्रम राबवला. तसेच, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनाही थोडी उसंत मिळावी म्हणून खासगी डॉक्टरांनी सेवा दिली. हा उपक्रम राज्यात अनोखा ठरला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र सेवा देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतील पोलिस व डॉक्टर या घटकांना दिलासा देण्यासाठी आमदार प्रा. रमेश बोरनारे, नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांनी दोन दिवस जनतेचे सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्यांना विश्रांती मिळावी म्हणून हा उपक्रम राबवला. यात आजी माजी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डाँक्टराच्या टीमने उपजिल्हा रुग्णालयात बाहयरुग्ण कक्षात रुग्ण तपासणी केली. पोलिसांची भूमिका बजावताना या लोकप्रतिनिधींनी चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करणे, लॉकडाऊन आणि संचारबंदीत बाहेर फिरणाऱ्या लोकांची चौकशी करणे ही कामे सांभाळली. तर, खासगी डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयात सेवा केली. डॉ. दिनेश परदेशी, साबेरखान, बाबासाहेब जगताप यांच्यासह अनेक लाेकप्रतिनिधींनी ही सेवा दिली. डॉ. भास्कर भांड, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. उद्धव सोनवणे, डॉ. नितीन बोरनारे, डॉ. शिंदे, डॉ.मोहन यांनी बाह्य रुग्ण कक्षात रुग्ण तपासणी केली.

कर्मचाऱ्यांनी मानले आभार...

सलग ४५ दिवसांपासून चेक पोस्टवर ड्युटी करून थकलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी वैजापूर शहर व ग्रामीण भागात शनिवारी राबवण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल लोकप्रतिनिधींचे मनापासून धन्यवाद मानले.

बातम्या आणखी आहेत...