आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात संशोधन व नवनिर्मितीला प्रचंड संधी आहे. यासाठी तरुण संशोधकांच्या वैज्ञानिक जाणिवा अधिक प्रगल्भ होणे गरजेचे आहे, असे मत परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार’ महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी त्यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, डॉ. मुस्तजीब खान, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे उपस्थित होते.
पूर्णवेळ संशोधक हवे : कुलगुरू डाॅ. येवले नोकरी आणि संशोधनापुरते पदवी प्रमाणपत्र मर्यादित असता कामा नये. विदेशाप्रमाणे आपल्याकडेही पूर्णवेळ संशोधकांची आवश्यकता आहे, असे कुलगुरू डॉ. येवले अध्यक्षीय समारोपात म्हणाले. डॉ. सुचेता एम्बल यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. पराग हासे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. आविष्कारसाठी डॉ. राम चव्हाण, डॉ. सतीश भालशंकर, डॉ. विष्णू पाटील, डॉ. प्रशांत अंबड, डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. राम कदम, डॉ. संदीप देशमुख आदींनी प्रयत्न केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.