आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑप्शन फॉर्मसाठी मुदत:अभियांत्रिकीच्या दुसऱ्या फेरीअखेरीस 35 टक्के जागांवरच प्रवेश निश्चित

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकीच्या पदवी (बीई, बी.टेक) प्रथम वर्षासाठी तिसऱ्या फेरीसाठी पर्याय (ऑप्शन) भरण्यासाठी सोमवारी शेवटची मुदत आहे. त्यानंतर ९ नोव्हेंबरला तिसऱ्या फेरीतील जागा वाटप झाल्यावर विद्यार्थ्यांना १० ते १२ नोव्हेंबरदरम्यान प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. मराठवाड्यातील २७ महाविद्यालयांत दुसऱ्या फेरीअखेर ३,३८६ अर्थात ३५.८८ टक्के प्रवेश झाले असून ६४.११ टक्के जागा अद्यापही रिक्त आहेत. मनाप्रमाणे कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थी अद्यापही बेटरमेंटचा पर्याय निवडण्यास प्राधान्य देत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात ११ अभियांत्रिकी महाविद्यालये असून, त्यापैकी एक शासकीय व इतर १० खासगी आहेत. ११ महाविद्यालयांत ४,३४४ प्रवेश क्षमता असून, पहिल्या फेरीत ८९४ जागांवर, तर दुसऱ्या फेरीत १८८३ (४३.३४ टक्के) प्रवेश निश्चित झाले असून २,१६३ जागा रिक्त आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारपासून वर्गही नियमित सुरू होणार आहे. द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी पहिल्या प्रवेश फेरीचे तात्पुरते जागा वाटप ७ नोव्हेंबरला जाहीर होणार असल्याचे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी सांगितले. विद्यार्थी कम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्सला पसंती दर्शवत आहेत. पसंतीची शाखा आणि कॉलेज मिळण्यासाठी ते बेटरमेंट निवडतात. मात्र, आता तिसऱ्या फेरीत प्रवेशाची अखेरची संधी विद्यार्थ्यांना राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...