आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मांतर न केल्याने औरंगजेबांनी दोघा लहान मुलांना जीवंतपणी भिंतीत पुरुन टाकले. त्या कोवळ्या वयात त्यांनी धर्मासाठी जीव दिला. धर्माप्रती अशी निष्ठा ठेवली पाहीजे. असा संदेश त्यांनी आपल्या जीवनातून दिला. म्हणून तुम्हीही धर्माशी एकनिष्ठ रहा, माणूसकीने वागा, असा संदेश उस्मानपूरा येथील गुरुसिंगसभा गुरुद्वाराचे सचिव कुलदिपसिंग निर यांनी 500 मुलांना दिला.
गुरूद्वारा समितीचे अध्यक्ष हरविंदरसिंग ब्रिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली जसपालसिंग ओबेरॉय, इंद्रजितसिंग छतवाल, प्रितपालसिंग ग्रंथी, हरविंदसिंग धोढी, खुशबीरसिंग, लखबीरसिंग कलोटी यांनी हे आयोजन केले.
अशी आहे कहाणी
मुघलांनी 20 डिसेंबर 1704 मध्ये आनंदपूर साहिब किल्यावर आक्रमण केले. यावेळी गुरु गोविंदसिंह पुर्ण परिवारासोबत किल्यावर होते. पण, मुघलांशी लढण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांनी किल्ला सोडला. सरसा नदी पार करताना गोविंदसिंहांचा परिवार त्यांच्यापासून दूर झाला. 4 मुलांपैकी दोन मुल त्यांच्या आईसोबत राहून गेली. पुढे फितुरीमुळे आई आणि जोरावर सिंह, फतेहसिंह पकडले गेले. ‘इस्लाम कबुल करा’, असा त्यांच्यावर जोर टाकण्यात आला. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना 26 डिसेंबर 1704 मध्ये भितींमध्ये जीवंतपणी गाडण्यात आले. दोघेही धर्मासाठी शहिद झाल्याने यंदापासून 26 डिसेंबरला बाल शहिद दिवस साजरा करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती.
प्रत्येक गुरुद्वारात होणार कार्यक्रम
उस्मानपूरा गुरुव्दाऱ्याचे कोषाध्यक्ष इंदरजीतसिंग छतवाल म्हणाले की, केंद्र सरकारने 26 डिसेंबर बाल शहिद दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. नांदेड गुरुव्दारामध्ये सर्वात मोठा सोहळा होईल. शहरातील तिन्ही गुरुद्वारा मिळून आम्ही सप्ताहभर आम्ही शहिदीबद्दल जनजागरण करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.