आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रसाद:उंडणगाव येथे ग्रामस्थांसोबत पंक्तीत राज्यमंत्र्यांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व शासकीय प्रोटोकॉल बाजूला सारून त्यांनी तालुक्यातील उंडणगाव येथे सुरू असलेल्या बालाजी धार्मिक महोत्सवात आयोजित महाप्रसादाचा जमिनीवर बसून लाभ घेतला. महाप्रसाद कार्यक्रमाला आपल्या संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व असून धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी असणारा हा कार्यक्रम असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. उंडणगाव तालुका सिल्लोड येथे श्रीबालाजी महाराज लळीत महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतेच सकल मारवाडी समाज बांधवांच्या वतीने आयोजित महाप्रसाद कार्यक्रमास भेट देऊन भक्तांसोबत महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी श्रीबालाजी मंदिर संस्थानच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत करण्यात आले.राज्यमंत्री सत्तार यांनी उंडणगाव येथे बालाजी लळीत उत्सवात पंक्तीत बसून महाप्रसाद घेतला.

बातम्या आणखी आहेत...