आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटल अभिनव योजना:महाविकास आघाडी सरकारने बंद केलेल्या योजनेस नवसंजीवनी, अतुल सावेंची घोषणा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सहकार विभागाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरणासाठी अटल अभिनव योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर गती देण्याची घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी केली.

पाच वर्षे पदाधिकाऱ्यांना काहीच दिले नसल्याने निवडणणुकीच्या तोंडावर पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्येक तालुक्यातून पाच लाभार्थ्यांची निवड निश्चित केली होती. जुन्या प्रस्तावांसह नवीन प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याचे सावे यांनी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) औरंगाबादेत पार पडलेल्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या मेळाव्यात सांगितले.

80 टक्के अनुदान

भाजपने राज्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सहकार विभागाच्या माध्यमातून अटल अभिनव योजना आणली होती. शेती उत्पादनावर निगडित प्रक्रिया उद्योगांचा यात समावेश करण्यात आला होता. तालुका उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून योजना राबविण्यात आली. एका व्यक्तीला वीस लाख रूपये प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी 80 टक्के अनुदानावर देण्याचे निश्चित केले होते.

शेतीशी पूरक व्यवसाय

राज्यभरातील तालुक्यांमधून अडीचशेवर प्रस्ताव गेले होते. या योजनेवर पाचशे कोटींचा निधी ठेवण्यात आला होता. विधानसभा 2019 नंतर राज्यांत सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने योजना गुंडाळली. यासाठी दाल मिल, आईल मिल आदींसह शेतीशी पूरक व्यवसायांचा समावेश करण्यात आला होता. भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्यातील अडीचशे मतदारसंघात एकनिष्ठपणे काम करावे हा देखील यामागचा हेतु होता.

योजना यशस्वी करण्याचा निश्चय

अशा प्रकारे हक्काचे कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात उभे करून मतदानासाठी त्यांचा कसा उपयोग करून घेता येईल ही यामागची रणनिती होती. आता फडणवीस पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी योजनेला गती देण्यासंबंधी सहकार मंत्री सावे यांना सांगितले. त्यानुसार सावेंनी आता नवीन प्रस्तांसह योजना यशस्वी करण्याच्या निश्चय केला आहे. मेळाव्यात यासंबंधी घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

बातम्या आणखी आहेत...