आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा:कृष्णा ठोंबरे ठरला दुहेरी मुकुटासह सर्वात वेगवान धावपटू; प्रतीक्षा, स्वाती, शुभमला सुवर्ण

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा संघटनेतर्फे आयोजित जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धेत कृष्णा ठोंबरे सर्वात वेगवान धावपटू होण्याचा मान मिळवला. कृष्णाने 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी मुकुट मिळवला. त्याचबरोबर, प्रतीक्षा वासके आणि स्वाती वाटणे यांनी देखील दुहेरी यश मिळवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत 230 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या दोन खेळाडूंची उस्मानाबाद, मुंबई व अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी औरंगाबादच्या संघात निवड झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या हस्ते झाले. जोशी म्हणाले की, जिल्ह्यातील खेळाडूंसाठी चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. लवकरच विद्यापीठाचा सिंथेटिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा ट्रॅक बनेल. त्यामुळे आपल्या खेळाडूंना मोठ्या स्पर्धेत उच्च दर्जाची कामगिरी करता येईल. तसेच, खेळाडूंना आर्थिक मदत देखील केली जाईल.

विजेत्यांचे संघटनेचे सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे, पंकज भारसाखळे, शशी नीलवंत, डॉ. रंजन बडवणे, डॉ. दयानंद कांबळे, मोहन मिसाळ यांनी अभिनंदन केले.

अंतिम निकाल पुढीलप्रमाणे :

20 वर्ष गट 100 मीटर धावणे - कृष्णा ठोंबरे, सम्यक गायकवाड. 200 मीटर - कृष्णा ठोंबरे, सम्यक गायकवाड. 400 मीटर - शुभम दवंडे, प्रताप शिरसाठ. 800 मीटर - भगवान जाधव, सचिन तायडे. 1500 मीटर - राजू धनवाई, गणेश मोकाटे. 3000 मीटर - संतोष भवले, अंकुश सपकाळ. 5000 मीटर - सुनिल दांगोडे, रवि कापसे. 110 मीटर हर्डल्स - कृष्णा दहीवाडकर. लांब उडी - रोहन मोहाते, अर्जुन अपशिंदे. गोळा फेक - ज्ञानेश्वर राठोड, सुनिल शिंदे. थाळी फेक - सौरभ धनवडे, नरेंद्र चौधरी. भाला फेक - आदित्य नरवडे, संदेश फोलाने.

मुली 100 मीटर धावणे - प्रतीक्षा वासके, गायत्री भोसले. 200 मीटर - स्वाती वटाणे, गीतांजली कळसकर. 400 मीटर - श्रावणी नानवरे. 800 मीटर - साक्षी मोरे, रिद्धी आकोलकर. 1500 मीटर - मयुरी सोनेट, दिव्या सोनवणे. 3000 मीटर - शुभांगी राजेंद्र. उंच उडी - आरती घायवट. लांब उडी - प्रतीक्षा वासके, रसिक तरडे. तिहेरी उडी - स्नेहा मदने. गोळा फेक - स्वाती वाटणे, रिधिमा आकोलकर. थाळी फेक - गीता वेलयकर, वैशाली लिंगायत. भाला फेक - गीता वेलांजकर, साक्षी शिंदे.

बातम्या आणखी आहेत...