आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्याद:लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; शिक्षकाला 7 फेब्रुवारीपर्यंत कोठडी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पुंडलिकनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. बालाजी गोरोबा गुंजरगे (५१, रा. शाहूनगर, शिवाजीनगर, गारखेडा परिसर) असे आरोपी नाव आहे. आरोपीला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. पाटील यांनी रविवारी दिले.

प्रकरणात ३८ वर्षीय शिक्षक महिलेने पुंडलिकनगर ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, पीडिता ही गर्भवती राहिली. तिने ही बाब आरोपीला सांगितली. ‘हे कोणाला सांगू नकोस. होणाऱ्या बाळाची जबाबदारी मी घेतो. लग्न करतो,’ असे म्हणत आरोपीने तिला आपल्या घरी ठेवले. त्‍यानंतर आरोपीने पीडितेला राजीनामा देण्यासाठी सांगितला व तिला लातूर येथे पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...