आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:मतिमंद तरुणीवर केला अत्याचार; दोघांवर गुन्हा, एकाला अटक, दुसरा फरार; बोरवाडीतील घटना

खुलताबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गदाना बोरवाडी येथे एका वृद्धाश्रम व रेफर सेंटरमध्ये राहत असलेल्या २५ वर्षांच्या तरुणीवर दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना घडली. खुलताबाद पोलिस ठाण्यात दोन जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली. दुसरा फरार आहे. गदाना बोरवाडी येथे दैवत वृद्धाश्रम व मायेची फुंकर असे दोन वेगवेगळ्या नावांचे सेंटर आहे. मायेची फुंकर रेफर सेंटरमध्ये १५ ते २० दिवसांपूर्वी एक २५ वर्षांची मनोरुग्ण तरुणी ही औरंगाबादच्या वेदांतनगर पोलिस ठाण्यामार्फत आणून सोडली होती.

आरोपी शैलेश व भारत यांनी २१ जून रोजी रात्री रेफर सेंटरमध्ये प्रवेश केला व मतिमंद तरुणीवर अत्याचार केला. सदरील घटना सेंटरचे मालक उमा तुपे यांना कळाली. तुपे यांनी खुलताबाद पोलिस गाठून शैलश व भारत या दोघांविरोधात मतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची तक्रार नोंदवली. दिलेल्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात शैलेश व भारत या दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची भेट
माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलिस उपनिरीक्षक संजय बहुरे, हेड कॉन्स्टेबल मनोज घोडके, महिला पोलिस नाईक आरती गावंडे यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन आरोपी भरतला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...