आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेठडी:आराेपींच्या घरात जिहादची कागदपत्रे सापडल्याचा एटीएसचा दावा; काेर्टाने सुनावली 10 दिवस काेठडी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादविराेधी पथकाने अटक केेलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता न्यायालयासमोर हजर केले, तर एकाला शुक्रवारी हजर केले जाणार आहे. देशविघातक कट रचणे, प्रक्षोभक भाषणातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आदी १४ मुद्द्यांच्या आधारे एटीएसने चार आराेपींना १५ दिवसांची पोलिस कोठडी मागितली. आराेपींच्या घरात जिहादशी संबंधित कागदपत्रे सापडल्याचा दावा एटीएसने केला. १४ पैकी दहाच मुद्दे न्यायालयासमोर मांडले. चार मुद्दे गोपनीय असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी आराेपींना १० दिवस कोठडी दिली. आमच्या मुलाने काय केले

दहशतवादविराेधी पथकाच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे
तीन वर्षांपासून देशाची गुप्तचर व तपास यंत्रणा या संघटनेच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
पीएफआय देशविघातक कारवाया करत असल्याचा संशय
दोन वर्षांत चार आराेपींनी शहरात विविध सभा, शिबिरे, कार्यशाळा घेऊन देशविराेधी कारवाया केल्या.
या कामासाठी परदेशातून त्यांना पैसा येत हाेता. चाैघांची बँक खाती तपासायची आहेत.
हिंदू व मुस्लिमांत तेढ निर्माण करण्याचा यांचाही प्रयत्न होता.
सभा, शिबिरे, कार्यशाळांत नेमके काय झाले, त्यात सहभागी लोकांची माहिती घेणे आहे.
चाैघांच्या घरात जिहादविषयी पुस्तके, हस्तलिखिते सापडली
इतर राज्यांत व देशात असलेले जाळे शोधायचे आहे.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सखोल तपास आवश्यक आहे.
घरझडती करून इलेक्ट्राॅनिक साहित्य, मोबाइल, लॅपटॉप, संगणक जप्त करायचे आहे.
या चौघांच्या संपर्कातील सक्रिय सदस्य शोधायचे आहेत.
(इतर चार गोपनीय मुद्दे थेट न्यायाधीशांकडे सादर केलेे.

बातम्या आणखी आहेत...