आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अट्टल अवैध दारू विक्रेता भाऊलाल जऱ्हाडे एमपीडीएखाली स्थानबद्ध

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अडीच वर्षांमध्ये सात कारवाया करूनही अवैधरीत्या दारूच्या भट्ट्या तसेच नशेच्या इतर पदार्थांची निर्मिती करणारा भाऊलाल उर्फ चिंग्या देवचंद जऱ्हाडे (३४, रा. पिसादेवी) याला एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुसऱ्यांदा ही कारवाई केली असून आणखी तीन अट्टल दारु विक्रेत्यांवर विभागाची नजर आहे. भाऊलालने चिकलठाणा व पाचोड भागात गेल्या अनेक वर्षांपासून बनावट दारू तयार करण्याचा उद्योग थाटला. पोलिस उपायुक्त प्रदीप पवार, पोलिस अधीक्षक संतोष झगडे यांच्याकडे त्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी त्याच्यावरील एमपीडीए प्रस्तावाला मंजुरी देताच ३१ जानेवारी रोजी त्याला कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...