आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल चोर:दुचाकी चोर शोधत असताना सापडले अट्टल मोबाइल चोर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पडेगावात मोबाइल शॉपी फोडून लाखो रुपयांचे मोबाइल चोरीला गेल्याची घटना १० मे रोजी घडली होती. या प्रकरणाचा तपास छावणी पोलिस करत होते. मात्र यातील दोन आरोपी सिटी चौक पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून चोरीतील ३० पैकी २१ मोबाइल विकण्याआधीच जप्त करण्यात आले. दुचाकी चोरांच्या शोधासाठी हे पोलिस कर्करोग रुग्णालयाच्या परिसरात गस्त घालत असताना मोहंमद रईस बोक्या ऊर्फ बोक्या मोहंमद हनिफ (३२, रा. पडेगाव) व फेरोज खान सुभान खान (३४, रा. भोईवाडा) हे त्यांच्या जाळ्यात अडकले.

प्रकाश भुजंगराव चेचाडे यांचे पडेगाव मिटमिटा येथील वाणी कॉम्प्लेक्समध्ये साईराज मोबाइल शॉपी नावाने दुकान आहे. ९ मे रोजी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले. १० मे रोजी सकाळी मात्र दुकानाचे शटर उचकटल्याचे समोर आले. त्यात चोरांनी महागडे ३० मोबाइल व इतर साहित्य चोरून नेले होते. छावणी पोलिस याचा तपास करत असताना दुसरीकडे सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, अशोक भंडारे यांनी दुचाकी चोरी संदर्भात कर्मचाऱ्यांना परिसरात साध्या वेशात गस्त घालण्याचे आदेश दिले होते.

त्यावरून गुरुवारी पोलिस नाईक माजीद पटेल, अंमलदार देशराज मोरे हे कर्करोग रुग्णालयाच्या आवारात साध्या वेशात उभे होते. तेव्हा रईस ऊर्फ बोक्या व फेरोज खान संशयित हालचाली करताना आढळून आले. निरीक्षक अशोक गिरी, अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मोसीन सय्यद, मुख्य हवालदार विलास काळे, सय्यद शकील, शेख गफ्फार, मजीद पटेल, देशराज मोरे, अभिजित गायकवाड यांनी कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...