आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:उच्च शिक्षित तरुणाकडून मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदानाचा प्रयत्न; मराठा समन्वयकांनी वाचवले प्राण

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • 'मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले'

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. दुसरीकडे गरीबीमुळे माध्यमिक ते उच्च शिक्षण घेता येत नाही. स्पर्धा परीक्षेत चांगले मार्क मिळाले तरी नोकरी लागत नाही. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी नैराश्यात जाऊन आत्मबलिदानाचा मार्ग पत्करत आहे. यापूर्वी 42 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तर बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका उच्च शिक्षित तरुणाने क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करून आत्मबलिदानाचा मार्ग निवडला होता. सोशल मीडियावर पोस्ट टाकून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करुन आत्महत्याचा प्रर्यत्न केला. मराठा समन्वयक अभिजित देशमुख व विनोद पाटील यांनी अवघ्या सात मिनिटांत घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला ताब्यात घेऊन घाटीत उपचारासाठी दाखल केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गत 30 वर्षांपासून लढा सुरू आहे. राज्य सरकारने सर्वेक्षण केले आहे. मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण व अभ्यास करून मराठा समाजाला स्वतंत्र एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले आहे. उच्च न्यायालयाने ते कायम ठेवले आहे. पण राजकीय षडयंत्र, जातीय द्वेषामुळे मराठा आरक्षणाला बोटावर मोजता येतील इतक्या लोकांनी कमालीचा विरोध करून सर्वात मोठ्या समाज बांधवांना वेठीस धरले आहे. विशेष म्हणजे मराठा समाज आरक्षणासाठी सर्व प्रक्रिया पार पाडून आरक्षण मिळवत आहे. हा लढा आणखी संपलेला नाही. पण यात गोरगरीब मराठा विद्यार्थी भरडले जात आहे. ४२ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तरी केंद्र व राज्य सरकाराबरोरच लोकशाहीच्या चारही स्तंभ गांभीर्याने घेत नाही. कोर्टाची तारीख पे तारीख व राजकारण्याचे घाणेरडे राजकारण होत असल्याने आरक्षणाचा प्रश्न आजही प्रलंबित राहिला आहे. यामुळे गारखेडा परिसरातील उच्च शिक्षित तरूणाने नैराश्यात जाऊन आत्मबलिदानाचा प्रयत्न केला. तर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगावात हजारो मराठा बंधू भगिनींनी उपोषण, ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

'मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले'

एमपीएससीच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये चार दिवसांपूर्वी एक याचिका करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये एमपीएससीने न्यायालयाला यादी पुनर्गठित करण्याची परवानगी मागितली आहे. "एमपीएससीवर राज्य सरकारचे नियंत्रण असते, मग एमपीएससी ने कुणाच्या सांगण्यावरून परस्पर याचिका दाखल केली? की राज्य सरकारचीच मानसिकता झाली आहे, की आता मराठा आरक्षण टिकणार नाही, त्यामुळे यादी पुनर्गठित करावी लागेल?" हे प्रश्न याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी यावेळी उपस्थित केले.

राज्य सरकारवर आरोप लावत पाटील पुढे असेही म्हणाले की, "आम्ही सातत्याने सांगत आल्याप्रमाणे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही आणि आता पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने असा घोळ न घालता सर्व विभागांची बैठक घेऊन सर्वांना सूचना कराव्यात व राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा कारभारी कोण हे जाहीर करावे.

राजकारण तापलय

एमपीएससीच्या धोरणा विरोधात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह अनेक मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राजकारण चांगलंच तापल आहे. याचा सर्व स्तरावर उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकार किती बळी घेणार?

माझा तरुण सहकारी दत्ता भोकरे यांनी आरक्षणाच्या नैराश्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने उचललेलं पाऊल अतिशय दुर्दैवी आहे, सुदैवाने त्याला वाचवण्यात यश मिळाले. दत्ताची सद्य परिस्थिती प्रकृती चांगली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, कोणत्याही युवकांनी असे पाऊल उचलू नये. आरक्षण आपल्या हक्काचं आहे, न्यायालयात आपल्याला आरक्षण मिळेलच ही खात्री आहे. आपला एक एक जीव हा महत्त्वाचा आहे. हात जोडून विनंती करतो, संयम ठेवा आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आपण जिंकूच! पण सरकार व लोकशाही यंत्रणा निष्पाप मराठा तरूणांचे किती बळी घेणार.- विनोद पाटील.

राज्यव्यापी उपोषण

साष्टपिंपळगाव,ता.अंबड येथून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ठिय्या व आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याला महाराष्ट्र बरोबर देशपातळीवरील सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे. तसेच केंद्र व राज्य सरकार विरोधात उद्रेक होण्याची शक्यता सर्वस्तरावर निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...