आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:जोडतळा येथे वाहिनीचा खून करणाऱ्या दिराचा विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, हिंगोलीत खाजगी रूग्णालयात उपचार सुरू

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथे शेतामध्ये भोजनासाठी बोलणाऱ्या वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून करणाऱ्या दिरानेही विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला बुधवारी (ता. २२) हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याठिकाणी पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला आहे

 हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील सविता संजय जाधव ( ३०) ह्या गावातील इतर महिलांसोबत जोडतळा शिवारातील एका शेतात निंदण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सर्व महिला शेतात झाडाखाली बसून जेवण करीत होत्या. यावेळी त्या ठिकाणी रामेश्वर ऊर्फ माधव जाधव हा देखील आला. त्याला पाहताच सविता जाधव यांनी जेवण्यासाठी बोलावले. मात्र त्याने सविता जाधव यांच्या जवळ येऊन मागचा-पुढचा विचार न करता त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलिस  उपाधीक्षक रामेश्वर वैजने, बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मनपिल्लू, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, धाबे, गोरले, महिला पोलीस कर्मचारी सारिका राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. 

या घटनेनंतर सविता जाधव यांचा दीर रामेश्वर उर्फ माधव जाधव यांनीही विशेष औषध पिले. त्याला तातडीने हिंगोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या खाजगी रुग्णालयासमोर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे.