आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास दानवे यांचा आरोप:मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न; भुमरेंचे प्रत्युत्तर- आमच्यावर पैठणकरांचे प्रेम

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला लोकांनी उपस्थित राहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत. मंत्री संदिपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यावर दानवे यांनी आधी लोकांमधून निवडून यावे, मगच आमच्यावर आरोप करावेत, असा टाेला भुमरे यांनी लगावला आहे.

हा तर सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग
मुंबई येथील पत्रकार परिषदेत दानवे म्हणाले, अंगणवाडी सेविकांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. गर्दी जमवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत आहे. सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना अद्याप मदत दिली नाही. इगतपुरी येथे आदिवासींची मुलांची वेठबिगारीसाठी विक्री झाली. सरकारने याची साधी दखलही घेतली नाही. हे सरकार असंवेदनशील, असल्याचे दानवे म्हणाले.

आमच्यावर पैठणच्या लोकांचे प्रेम

पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा हाेणार हे ऐकूनच दानवे यांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे ते नको ती बडबड करत आहेत. सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. आमच्यावर पैठणच्या लोकांचे प्रेम असल्याने रेकॉर्डब्रेक गर्दी होईल. दानवे हे विधान परिषदेवर निवडून आले आहेत. त्यांना लोक भाड्याने आणावे लागतात. मी तीस वर्षांपासून लोकांमधून निवडून येताेय. दानवेंनी आधी लोकांमधून निवडून येऊन दाखवावे, असे मंत्री संदिपान भुमरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...