आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजमिनीचे खरेदी खत असताना, जमीन मालकाच्या ताब्यात असतानाही मूळ मालकाचे सातबाऱ्यावरील नाव कमी करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी अलीमोद्दीन खान जलालोद्दीन खान (४६, रा. कटकट गेट), फारूख खान इक्बाल खान (४७, रा. बाबर कॉलनी) आणि शेख मुकीम अहेमद (५४, रा. चिश्तीया कॉलनी) या तीन आरोपींनी सादर केलला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वानखेडे यांनी नामंजूर केला. सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी काम पाहिले.
या प्रकरणात अब्दुल रहीम अब्दुल करीम (वय ७०, रा. अल फरहान कॉलनी, पोलिस मेससमोर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांनी नारायण हाउसिंग सोसायटी, सर्व्हे नंबर ४/७ हत्तेसिंगपुरा यांच्याकडून ३३ गुंठे जमीन १९९० मध्ये खरेदी केली. ही जमीन अब्दुल रहीम अब्दुल करीम यांच्या ताब्यात असून तेथे काढलेल्या दुकानाचे भाडेही ते घेतात.
मात्र, त्यांची जमीन विक्री करण्यासाठी असल्याची माहिती त्यांना मिळाली. अलीमोद्दीन जमालोद्दीन हा जमीन विक्री करीत असल्याचेही कळाले. कागदपत्रांची माहिती घेतली असता, संबंधितांनी अब्दुल रहीम यांच्या जमिनीमधील १८.९९५ चौ. मी. जागेबाबत न्यायालयात खोटे व बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली. तसेच न्यायालयात तडजोडपत्र सादर करून जमिनीबाबत आदेश मिळवून सातबाऱ्यात अब्दुल रहीम यांच्या नावाची जमीन कमी करून स्वत:चे नाव लावून घेतले.
खोटे दस्तऐवज तयार या प्रकरणात अब्दुल रहीम यांनी कोणत्याही प्रकारचे मुखत्यारपत्र फारूख खान यांच्या नावाने करून दिलेले नसताना, खोटे दस्तऐवज तयार करून रहीम यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अलीमोद्दीन जलालोद्दीन, फारूख अहेमद, शेख मुकीम अहेमद यांच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून २० फेब्रुवारीला आरोपींना अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.