आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघराच्या बागेतील वाळलेला कचरा वॉर्डात कुठेही जमा होतो. यानंतर तो जाळला जातो. त्यामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचे बघायला मिळते. यावर उपाय म्हणून प्रयास यूथ फाउंडेशन आता पालापाचोळ्याचे संकलन करून सेंद्रिय खताच्या निर्मितीचा उपक्रम राबवणार आहे. नागरिकांना मोफत खतनिर्मिती करून जनजागृती केली जाणार आहे. शहरात वाढत्या प्रदूषणात वायू प्रदूषण मोठी समस्या आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो.
संस्थेतर्फे पानझडीचा सकारात्मक उपयोग डिसेंबर महिन्यापासूनच झाडांच्या पानांच्या गळतीला सुरुवात होते. सध्या जागोजागी पालापाचोळा जाळल्याने धुरामुळे त्रास होत आहे. त्यासाठी प्रयास फाउंडेशन चिकलठाणा आणि जलसंपदा अशा दोन ठिकाणी सेंद्रिय खतनिर्मिती करणार आहे. वाळूज परिसरातील औद्योगिक, सामाजिक संस्था, नागरिकांमार्फत पालापाचोळा जमा करून खतनिर्मिती करून देणार आहे. मागील वर्षी ५ टन पालापाचोळा जमा झाला. त्यात ६० टक्के कचरा मल्चिंगसाठी वापरण्यात आला, तर १ टनापर्यंत खतनिर्मिती करुन दिली होती. या वर्षीही प्रयासच्या वतीने हा उपक्रम हाती घेतला आहे.
शहर रेड झोनमध्ये असल्याने चिंता औरंगाबाद शहर वायू गुणवत्ता उच्चांकमध्ये ऑरेंज आणि कधी रेड झोनमध्ये राहते. ही चिंतेची बाब आहे. याला कमी करण्यासाठी आम्ही विविध उपाययोजनांवर काम करण्यासाठी सुरुवात केली आहे. या वर्षी पालापाचोळ्यापासून खतनिर्मिती करणार आहे. रवी चौधरी, प्रयास यूथ फाउंडेशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.