आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घृणास्पद कृत्य:बापलेकाकडून 10 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, औरंगाबादेतील घटना; दोन अटकेत, एक फरार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून बापलेकाने दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भीमनगर, भावसिंगपुऱ्यात घडली. याप्रकरणी उत्तम देवराव गडकर, त्याचा मुलगा रवी गडकर यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर किरण गडकर हा फरार आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून भीमनगर, भावसिंगपुरा परिसरातील बापलेक दहा वर्षीय बालिकेशी अश्लील चाळे करत होते. प्रतिकार केल्यानंतर तिला मारहाण केली जात होती. ३ मे रोजी बालिकेचे आईवडील कामावर गेले. घरी येण्यासाठी उशीर होत असल्यामुळे बालिकेसह तिच्या मुलाला गडकर याच्या घरी थांबायला सांगितले होते. तेव्हा पलंगावर उत्तम गडकर हा बालिकेशी अश्लील चाळे करत होता. या प्रकाराची आठ वर्षीय बालकाने सुनीता किरण गडकर हिच्या मोबाइलमध्ये शूटिंग केल्याचे आईला सांगितले. त्यानंतर त्यांनी छावणी ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भागिले करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...