आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:वसमत येथे मित्राच्या बहिणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, आरोपीकडून घरात तोडफोड

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पुढिल तपास करीत आहेत.

वसमत शहरातील सोमवार पेठ भागात मित्राच्या विधवा बहिणी वर डोळा ठेवून अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र त्याला विरोध झाल्याने आरोपीने त्यांच्या घरातील सामानाची नासधूस केली. याप्रकरणी शुक्रवारी ता. 16 पहाटे वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे. विश्वनाथ लासिनकर असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत येथील गणेश पेठ भागातील विश्वनाथ आंबादास लासिनकर हा त्याच्या मित्राकडे सोमवार पेठेत जात होता. त्याच्या मित्राचे भाऊजी वारल्यानंतर त्याची बहीण तिथेच राहत आहे.

मागील काही दिवसापासून विश्वनाथचा मित्राच्या बहिणी वर डोळा होता. मित्राच्या बहिणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर गुरुवारी ता. १५ सायंकाळच्या सुमारास तो मित्राच्या घरी आला. त्यानंतर त्याने त्याच्या विधवा बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर घरातील इतर कुटुंब मदतीसाठी धावून आले. त्यामुळे रागाने विश्वनाथ याने घरातील टेबल, खुर्च्या, कपाट व इतर साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर तेथून पळ काढला.

दरम्यान पीडित महिलेने कुटुंबीयांसह वसमत पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात रितसर तक्रार दाखल केली. या प्रकरणात आज पहाटे वसमत शहर पोलीस ठाण्यात विश्वनाथ लासिनकर याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, जमादार प्रशांत मुंढे यांनी भेट दिली. पोलिसांनी विश्वनाथ यास ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पुढिल तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...