आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खा. इम्तियाज यांच्या इशाऱ्यावर धर्मांतराचा प्रयत्न:औरंगाबादेत लव्ह जिहाद : मंत्री अतुल सावे यांचा आरोप

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझा संबंध नाही, आरोपांवर बोलणार नाही : खा. इम्तियाज

एमआयएमचे येथील खासदार इम्तियाज जलील यांच्या थेट इशाऱ्यावर औरंगाबादमध्ये लव्ह जिहादचा प्रकार झाला, असा गंभीर आरोप सहकारमंत्री अतुल सावे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी सोमवारी स्वत: पोलिस आयुक्तालयात जाऊन आयुक्त डाॅ. िनखिल गुप्ता यांना सखोल चौकशी करा, अशी मागणी करणारे निवेदन दिले.

‘दिव्य मराठी’शी बोलताना सावे यांनी सांगितले की, ‘होय, हे लव्ह जिहादचेच प्रकरण आहे. बौद्धधर्मीय तरुणाला मुस्लिम होण्यासाठी मारहाण झाली. खासदारांच्या इशाऱ्यावर हा प्रकार होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्यानेच मी स्वत: पोलिस आयुक्तालयात जाऊन आयुक्तांना भेटलो. कारण पोलिस यंत्रणा त्यात तपास करण्यास कुचराई करत असल्याचे माझ्या निदर्शनास आले.’ दरम्यान, इम्तियाज म्हणाले की, माझा काहीही संबंध नाही. बकवास आरोपांवर मी काहीही बोलणार नाही.

अभियंता दीपक रामदास सोनवणे याच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची माहिती भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली होती. पण त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली नाही म्हणून आयुक्तांकडे जावे लागले, असे सावे यांनी सांगितले. तर दीपक म्हणाले की, खासदार इम्तियाज यांनीच मला एकट्याला रोजाबागजवळील निवासस्थानी बोलावून मारहाण करण्याचे फर्मान सोडले.

वारंवार पैशाची मागणी देवळाई परिसरात राहणारे दीपक यांच्याशी दिव्य मराठीने संपर्क साधला असता त्यांनी जे सांगितले ते असे : मी आणि ती मुलगी २०१८ पासून एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्हा मला लग्नाचे आमिष दाखवत तिने वारंवार पैशाची मागणी केली. आपण तिला ऑनलाइन अकरा लाख रुपये वेळोवेळी दिले. तिने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव आणला. कुराण वाच आणि नमाज पठणास वारंवार सांगितले. २०२१मध्ये तिचे आई- वडील, काका, बहिणीने मला बाहेर जायच्या निमित्ताने गुलमंडीवर बोलावले. नारेगाव येथील त्यांच्या घरी नेत कोंडून ठेवत मारहाण केली. हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबत अंगावर लघुशंका केली. या प्रकाराची चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. सिटी चौकातील एका दवाखान्यात नेऊन खतना केली.

२५ लाख रुपये दिले नाही तर गुन्हा दाखल करू म्हणून धमकावले. मी नकार दिल्यावर त्या मुलीने माझ्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मग मी तिच्या विरोधात वेदान्तनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तेव्हा त्या मुलीने मला ८५ हजार रुपये देते, म्हणून रोझेबाग येथील खासदार इम्तियाज यांच्या घराजवळ बोलावले. तेथे बंद खोलीत इम्तियाज यांच्यासमोर त्यांच्या अंगरक्षकाने मला मारहाण केली. इम्तियाज यांनी माझा मोबाइल हिसकावून घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...