आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे मतदानासाठी गावाकडे आलेल्या पत्नीचा खून करून पतीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अत्यवस्थ पतीवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या बाबतची माहिती अशी की रतन सांडू साळवे (वय45) व त्यांची पत्नी आशा रतन साळवे (वय 38 रा. कुंभारी ता. भोकरदन) हे कामानिमित्त वडगाव कोल्हाटी (ता. औरंगाबाद) येथे 4 ते 5 महिन्यांपूर्वी गेले होते. त्यांच्या सोबत मंगेश हा 17 वर्षाचा मुलगा व एक मुलगी सुध्दा होती मात्र 15 जानेवारी रोजी कुंभारी ग्रामपंचायत ची निवडणूक असल्याने हे दोघे पती पत्नी 14 जानेवारी रोजी कुंभारी येथे आले होते, ते हसनाबाद रोडवरील राहुल नगर झोपडपट्टी परिसरातील घरात थांबले होते.
16 जानेवारी रोजी सकाळी या दोघांना शेजाऱ्यांनी घरात बघितले मात्र सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावले होते व घरातील लोखंडी पलंगावर आशा रतन साळवे ही झोपली असल्याचे एका प्रांगणात खेळत असलेल्या मुलीने बघितले व शेजाऱ्यांना सांगितले, शेजाऱ्यांनी खिडकीतून बघितले तेव्हा आशा साळवे यांच्या तोंडातून रक्त बाहेर निघत असल्याचे दिसले त्यामुळे गावकऱ्यांनी भोकरदन पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिग बहुरे, पोलिस निरीक्षक चत्रभुज काकडे, पोलिस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस कर्मचारी रामेश्वर शिंनकर, यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.