आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दामिनी पथकाची मदत:काचेच्या तुकड्याने स्वत:चा गळा चिरून आत्महत्येचा प्रय‌त्न

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका तरुणाने हातातील काचेच्या तुकड्याने स्वत:च्या गळ्यावर वार करत गळा चिरून आत्महत्येचा प्रय‌त्न केला. यातील राम बाबुलाल बरालिया (२८, रा. गुजरात) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. ही घटना सिडको वाळूज महानगर-२, ग्रोथ सेंटर येथे सोमवारी दुपारी ३.३० वाजता घडली. उल्लेखनीय बाब अशी की, मला जगायचे नाही, मला मदत करू नका, असे म्हणत राम गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी मिळाली.

एक तरुण मनाशी काहीतरी पुटपुटत हातातील काचेचा तुकडा स्वत:च्या गळ्यावरून फिरवत असल्याचे दृश्य सोमवारी दुपारी एका तरुणाने त्याच्या मोबाइलमध्ये कैद केले. विशेष म्हणजे संबंधित तरुण आत्महत्या करत असल्याचा अंदाजही व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला आला. मात्र, तरीदेखील रामच्या मदतीला न जाता सदरील घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत वाहवा मिळवण्यात त्याला मोठेपणा वाटला.

यादरम्यान या मार्गे वाळूजच्या दिशेने जाणाऱ्या दामिनी पथकाने वाहन थांबवून रक्तबंबाळ झालेल्या तरुणाला स्वत:च्या वाहनातून स्थानिकांच्या मदतीने घाटीत दाखल केले. सध्या रामवर उपचार सुरू असून तो वेडसर असल्याचे प्राथमिक चौकशीत समाेर आल्याचे गुरमे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...