आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार:राज्य सुरक्षा मंडळाच्या भरतीत 1500 पैकी 750 उमेदवारांची उपस्थिती

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या वैधानिक महामंडळांतर्गत येणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाने दोन वर्षांनंतर सुरक्षा रक्षक भरतीला सुरुवात केली आहे. शनिवारी साताऱ्यातील एसआरपीएफच्या मैदानावर पहिल्या दिवशी १६०० उमेदवारांपैकी ७५० उमेदवारांनी हजेरी लावत १६०० मीटर धावण्याची चाचणी दिली. यात सर्वाधिक ग्रामीण भागातील तरुणांची संख्या होती. त्यातही अनेकांची वजन भरवण्यासाठी धडपड होती. या वेळी अनेकांनी वजन कमी भरू नये यासाठी पाणी आणि केळीचा भडिमार केला. परंतु, त्यामुळे पळण्यात अडचण निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शी अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यभरातील ७ हजार जागांसाठी १ लाख ३३ हजार ६९३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही भरती प्रक्रिया एसआरपीएफच्या मैदानांवर हाेईल. त्यापैकी सातारा एसआरपीएफ केंद्रावर १९,३२२ उमेदवार चाचणी देतील. सुरुवातीला छाती व वजन मोजमाप झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यानंतर १६०० मीटर धावण्याची चाचणी हाेईल. ही प्रक्रिया सोमवारपासून पूर्ववत सुरू होईल. या वेळी समादेशक निमित गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.

भूलथापांना बळी पडू नये : राज्य सुरक्षा महामंडळ कंत्राटी पद्धतीवर प्रक्रिया पार पडत असून कोणीही यात थेट भरती करून देण्याचे आमिष दाखवत आहे. परंतु, ही प्रक्रिया शासकीय स्तरावर होत असून यासाठी कोणीही पैशांच्या भूलथापांना बळी पडू नये. तसे कोणी भेटल्यास तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी केले आहे.

या भरती प्रक्रियेसाठी बारावी उत्तीर्ण आवश्यक असून १२ वी परीक्षेत ७० पेक्षा अधिक गुण असल्यास ५० गुण, ६० ते ७० साठी ४० गुण, ५० ते ६० असल्यास ३० गुण, ४० ते ५० असल्यास १० गुण ग्राह्य धरले जातील. ४० गुणांच्या खालील उमेदवारांना ० गुण मिळतील. तर शारीरिक चाचणीसाठी ५० गुण आहेत.

बातम्या आणखी आहेत...