आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 शब्दांची कथा:दृष्टिकोन महत्त्वाचा...

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका व्यक्तीबद्दल प्रसिद्ध झाले की, त्याचा चेहरा अशुभ आहे. लोकांनी याची तक्रार राजाकडे केली. राजा त्याला बघायला गेला. योगायोगाने राजा त्या दिवशी उपाशी राहिला. त्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा वाईट असल्याचे त्याला वाटु लागले. राजाने फाशीची शिक्षा सुनावली. मंत्र्याने विचारले, त्याला शिक्षा का देता? राजा म्हणाला, तो वाईट आहे. त्याचा चेहरा पाहिला तर मी दिवसभर उपाशी राहिलाे. मंत्री म्हणाला, महाराज त्यानेदेखील तुमचा चेहरा पाहिला. तुम्हाला जेवण मिळाले नाही पण त्याला तर मृत्युदंड मिळत आहे. चांगल आणि वाईट आपल्या दृष्टिकोणावर अवंलबून असते.

बातम्या आणखी आहेत...