आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यातील विकास कामे होत असल्याने शिवसेना आमदार नाराज आहेत, असा दावा भाजप आमदार अतुल सावे यांनी दिव्य मराठीशी बोलताना केला. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार सध्या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
विधान परिषद निवडणुकीचा जल्लोष
विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाच जागांवर विजय मिळवला. या विजयाचा औरंगाबादमध्ये मंगळवारी गुलमंडीवर भाजपच्या वतीने जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. गुलाल उधळला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
सावे म्हणतात की?
एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत मराठवाड्यातील शिवसेनेचे दोन मंत्री आणि पाच ते सहा आमदार असल्याचे समजते. हे सारे जण नॉट रिचेबल आहेत. यावर बोलताना अतुल सावे म्हणाले की, अडीच वर्षांत कुठलेही कामे झालेली नाहीत. त्यामुळे हे आमदार नाराज आहे, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, यावेळी संजय केनेकर, भगवान घडामोडे, अनिल मकरिये, प्रशांत देसरडा, शिवाजी दांडगे यांची उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.