आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्ती संपली, तरी शिवसेना भ्रमात:मराठवाड्यात लोकसभेचे 8 उमेदवार भाजपच्या चिन्हावर विजयी होतील; सावे यांचा दावा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपची मराठवाड्यात ताकद नसून त्यांना मराठवाडामध्ये उमेदवार मिळणार नसल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. यावर सहकार मंत्री अतुल सावे यांनी भाजपची सर्वत्र तयारी झाली असून, भाजपच्या चिन्हावर उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राज्य सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा दावाही सावे यांनी केला. तर 50 आमदार गेले, तरी शिवसेना याच भ्रमात राहत असून, त्यांनी याच भ्रमात रहावे, असा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आला आहे. संध्याकाळी पाच वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी सांस्कृतिक मैदानावर करण्यात आली आहे. सहकार मंत्री अतुल सावे आणि भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर अनिल मकरिये यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी या सभेच्या तयारी बाबतची पाहणी केली. सभेला मोठ्या सख्येने नागरिक येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कार्यकाळ पूर्ण करेल

संजय राऊत सरकार पडणार असल्याचा दावा करत असल्या बाबत अतुल सावे म्हणाले की, संजय राऊत रोज काही आरोप करत असले तरी त्यांच्यामध्ये काही तथ्य नाही हे सरकार त्यांचं कार्यकाळ पूर्ण करणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये भाजपची मोठ्या प्रमाणात ताकद आहे. त्यामुळे भाजपकडे उमेदवार देखील आहेत. कमळाच्या चिन्हावर हे उमेदवार निवडून येतील असे सांगत त्यांनी अंबादास दानवे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.

Edit Video Thumb
Edit Video Thumb

50 आमदार गेले तरी शिवसेना भ्रमातच

भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले की अंबादास दानवे आणि शिवसेना जुन्याच भ्रमात आहे. त्यांचे 50 आमदार गेले आहेत. मात्र, त्यांना अजूनही आपली शक्ती कायम असल्याचा भ्रम आहे बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा अजूनही चालेल असे त्यांना वाटते त्यांनी याच भ्रमात राहावे भाजप सर्व मतदारसंघात आपली ताकद वाढवत असल्याचे शिरीष बोराळकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...