आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसच्याच इशाऱ्यावर झुलणाऱ्यांनी भाजपची काळजी करू नये. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात भाजपची ताकद आहे. त्यामुळे पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असे सहकारमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर देताना शहराध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले की, ५० आमदार फुटले तरी उद्धवसेना भ्रमाच्याच भोपळ्यात मश्गूल आहे.
सावे म्हणाले की, खासदार संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलटे होते. ते जे बोलतातत त्यावर दुसऱ्या दिवशी पलटीही मारतात. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार विकासाच्या कामांना वेग देऊन कार्यकाळ पूर्ण करणार. सावे म्हणाले की, औरंगाबादेत पक्ष जो उमेदवार देईल त्याला आम्ही निवडून आणू. येणाऱ्या निवडणुका भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढवणार आहे. राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ च्या एकत्र जागा लढवून जास्तीत जास्त जिंकणार आहोत. देशात ४०० जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे.
त्यांनी भ्रमातच राहावे बोराळकर म्हणाले की, उद्धव ठाकरे, दानवे आणि उद्धवसेनेने अजूनही बाळासाहेब ठाकरेंचा करिष्मा चालेल, या भ्रमातच राहावे. पण उद्धवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने परिस्थिती बदलली आहे. लोकांना हा घरोबा मान्यच नाही. ५० आमदार फुटले तरी आपणच शक्तिमान आहोत असे वाटत राहणे हे आमच्यासाठी चांगलेच लक्षण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.