आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:काही गोष्टी बाबत आक्षेप असेल तर अपील करू; न्यायालयाचा निर्णय जनतेच्या मनातील- अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयामुळे आता विरोधी पक्षांनी न्यायालयाच निर्णय मान्य केला पाहिजे. न्यायालयाने मुख्यमंत्र्याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच त्यांच्यावर कुठेही ताशेरे ओढले नाहीत. एखादी गोष्ट चुकली असेल तर त्याच्यासाठी आम्ही न्याय मागू, असे मत मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान अतुल सावे पुढे बोलताना म्हणाले की, त्यासाठी अपील देखील करू. आम्ही जनतेचे काम करत आहोत. लोकांचा आर्शिवाद आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. सावे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सून पूर्व बैठकीसाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

सावे म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांनी निकाल त्यांच्या बाजूने लागावा यासाठी पुजा केली. मात्र जनता ही कामाला न्याय देते. पुजा पाठ करण्याला आमचा विरोध नाही. मात्र लोकप्रतिनिधीनी जनतेची कामे केली पाहिजे. जनतेने त्यासाठी निवडून दिले पाहिजे. तसेच न्यायालयाने राज्यपाल तसेच प्रतोद पदाच्या बाबत आक्षेप नोंदवले आहेत. त्याबाबत विचारले असता सावे म्हणाले की, ज्या गोष्टीच्या बाबत न्यायालयाने आक्षेप घेतले असतील त्याबद्दल खुलासा करू.

सावे पुढे म्हणाले की, तसेच न्यायालयासमोर ते मांडू आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू. तर विधानसभा अध्यक्षाकडे निर्णय बाबत विचारले असता आमचे अध्यक्ष अँडव्होकेट आहेत. ते चांगला योग्य निर्णय देतील. तसेच न्यायालयाने दिलेला निर्णय हा आमच्या सरकारच्या दृष्टीने जनतेच्या मनातला निर्णय आहे. जनतेला हेच अपेक्षीत होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता हे सरकार विकासाची कामे गतीने करणार आहेत असे सावे यांनी सांंगितले.