आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या देशात जवान आणि किसान हे दोन महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्यामुळेच आपला देश चालतो हे आपण विसरता येणार नाही. देशातील जवान सीमेवर रक्षण करतो आणि बळीराजा शेतात राबतो आहे. म्हणून आपला देश सुरक्षित आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. ते कन्नड तालुक्यातील औराळा येथील शहीद सुनिल जाधव यांच्या शहीद दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन (दि.7) ला शुुक्रवारी करण्यात आले यावेळी दानवे बोलत होते.
भारत देश ही शुरविरांची, छत्रपती शिवरायांची महाराणा प्रतापाची भूमी त्यामुळे या भूमीतील माणसाला लढायचे कसे शिकवावे लागत नाही. तो या मातीतला गुण आहे. शहिद सुनिल जाधव यांनी देशासाठी दिलेल्या बलिदान हे गावासाठी नव्हे तर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, असेही दानवे म्हणाले.
पदाधिकाऱ्यांनी तावातावाने भाषणे केली, आश्वासने दिली पण...
कृषिभुषण भाऊसाहेब थोरात यांनी बोलताना सांगितले की, शहिद जाधव यांच्या अंत्यविधीच्या वेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी तावातावाने भाषणे केली, आश्वासने दिली पण एकाही आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. ज्या माणसाने आपल्यासाठी देशासाठी आपल्या कुटुंबाला सोडले आई-वडिलांना सोडला त्याच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे त्या भावनेतून हे स्मारक उभा राहील. देशासाठी बलिदान देणाऱ्या छप्पन इंच छातीच्या वाघाचे स्मारकाचे चौकात पाहिजे की भावना मनात होती.
यावेळी जिल्हा बँकेचे चेरमण तथा माजी आमदार नितीन पाटील, बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ अण्णासाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस केशव राठोड, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष देविदास राठोड, उपसरपंच आकाश पगारे, माजी सरपंच चंद्रकांत देशमुख यांनी शहीद सुनिल जाधव यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले.
यावेळी अक्षय सुनिल जाधव यांनी प्रास्ताविक प्राध्यापक ऋषिकेश जाधव यांनी सुत्रसंचालन तर सतिष जिवरख यांनी आभार मानले. यावेळी विरपिता उत्तमराव जाधव, विरमाता मिराबाई जाधव, प्रियंका भोसले, मेजर अमोल खैरनार, सरपंच सोनाली बागुल, अमृत बिरारीस, तलाठी जठार, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी. खांडखुळे, बीट जमादार भास्कर खुळे, विजय धुमाळ, व्ही.डी. तागडे, गिरी, पोलीस पाटील सतिष पगारे, योगेश पवार, दिपक जिवरख, औराळीचे सरपंच कडुबा कुमावत, काकासाहेब काळे, कैलास देशमुख, दिशांत जिवरख, लोन आँफीसर विश्वास सोनवणे, शेषराव निकम, रमेश नलावडे, गोरख बोराडे, ज्ञानेश्वर बोरसे, योगेश खैरनार, पांडुरंग तुपे, प्राचार्य कैलास नलावडे, संदिप जिवरख, महेद्रकुमार भारतीया आदिनी शहीद जाधव यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण
शहिद सुनील जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यासह अनेक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात आदित्य संतोष निकम, शुभम दादासाहेब मस्के, यशवंत अप्पपासाहेब वारे, वैभव चांगदेव गुजराणे, कौशिक ज्ञानेश्वर वारे, लखन खवळे अभिजीत संतोष निकम यांच्यासह सर्व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
शहिद जााधव यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन
औराळा येथे विभागीय संगटन मंत्री संजयजी कौडगे, जिल्हा अध्यक्ष विजय औताडे संघटन सरचिटणीस लक्ष्मणजी औटे, कार्यालय मंत्री धनंजय कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष संजयजी खांबायते, डॉ संजय गव्हाणे, जिल्हा परिषद सुरेश गुजराणे, तालुका अध्यक्ष भगवान कोल्हे, तालुका सरचिटणीस सुभाष काळे, काकासाहेब तायडेे, बाबासाहेब काळे, पोपट गुजराणे, पप्पु दौगे, उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.