आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद आणि जर्मनीमधील इंगोलस्टॅट शहरामध्ये ‘सिस्टर सिटी’ म्हणून शुक्रवारी (८ एप्रिल) करार करण्यातआला. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षरी केली. मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय इंगोलस्टॅटचे महापौर डॉ. ख्रिस्तियन श्राफ यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून इंगोलस्टॅटचे महापौर डॉ. ख्रिस्तियन श्राफ, उपमहापौर डॉ. दोरोथे डेनेके, इंगोलस्टॅटचे शिक्षण आणि सांस्कृतिक विभागप्रमुख गॅब्रिएल एंजर्ट, सांस्कृतिक विभागाच्या क्रिस्टिना दिएडरीच, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या प्रमुख ब्रिगीट स्टॉकल, मेलानी कुनेल, जर्मनीतील भारताचे कौन्सिल कौन्सुलेट जर्नल डॉ. सुयश चव्हाण, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेवसिंग, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक रंगा नायक उपस्थित होते. विशेष म्हणजे ऑडी या प्रसिद्ध जर्मन वाहन उत्पादक कंपनीचे मुख्यालय इंगोलस्टॅट येथेआहे.औरंगाबादेतही ऑडी कंपनीचा प्रकल्पआहे.
मराठवाड्याच्या भूमिपुत्राच्या प्रयत्नातून करार शक्य : या करारामुळे औरंगाबाद आणि इंगोलस्टॅटमध्ये शिक्षण, संस्कृती, आरोग्य, क्रीडा, उद्योग, पर्यटन, कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांत भागीदारीच्या संधी निर्माण होतील.
दोन्ही शहरांमध्ये स्टुडेंट एक्स्चेंज प्रोग्रॅम, औद्योगिक भागीदारी, पर्यटन यांना चालना मिळेल. जोपर्यंत दोन्ही शहरांचा प्रतिसाद मिळत राहील, तोपर्यंत हा करार कायम असेल. या कराराला कुठलीही कालमर्यादा नाही, असे पांडेय यांनी सांगितले. मराठवाड्याचे भूमिपुत्र डॉ. सुयश चव्हाण हे आयएफएस अधिकारी जर्मनीत भारताचे कौन्सिल कौन्सुलेटआहेत. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दोन शहरांना जोडणे शक्य झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.