आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदन तस्करी:औंढा पोलिसांनी चंदन तस्कराला घेतले ताब्यात, 3 लाखांचा ऐवज जप्त

हिंगोली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये चंदनाचे लाकूड आढळून आले

औंढा नागनाथ तहसील समोरील लोहरा रोडवर गुरुवारी (ता. ११) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एका चार चाकी वाहनाचे तपासणी केली असता त्यात चंदनाचे लाकूड आढळून आले. पोलिसांनी चंदनाचे लाकूड व कार असा तीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना त्यांना लोहरा रोडवर एक इंडीगो कार ( एमएच- ०१-एई - ०६५९) दिसून आली. पोलिसांनी कार चालक व त्यामधील व्यक्तींची चौकशी सुरू केली. मात्र पोलिसांना पाहताच कारमधील दोघांचीही घाबरगुंडी उडाली. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये चंदनाचे लाकूड आढळून आले. सदर लाकूड शिरला येथून लोहरा गावा कडे नेले जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. पोलिसांनी उमाकांत विठ्ठलराव बोंगाने ( रा.उमरा, ता. औंढा) यास ताब्यात घेतले. तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला त्याचे नाव दिनेश जाधव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सुमारे एक लाख रुपयांचे चंदन व दोन लाख रुपये किंमतीची कार असा तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. औंढयाचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनकर विरकर, ज्ञानेश्वर गोरे, अतुल बोरकर, गजानन गडदे, संतोष धनवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...