आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार इम्तियाज जलीलांचा आरोप:राणांवर राजद्रोहाचा गुन्हा, मग राज ठाकरेंवर का नाही, त्यांनीही दोन समाजात तेढ निर्माण केली

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरेंना जामीन मिळावा अशी कलमं राज्य सरकारने लावली आहेत. असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी लावत, मनसेंसह ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राणा दाम्पत्याला एक आणि राज ठाकरेंना एक वागणूक का असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी विचारला आहे. राज ठाकरेंचे विधान हे जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे आहे.

सर्व राजकीय पक्षांची मिलीभगत

सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भावाला त्रास होणार नाही, अशीच कलमं लावली आहेत, तर राष्ट्रवादीने भविष्यात राज ठाकरेंसोबत जाण्यासाठी पर्याय खुला रहावा यासाठी ही कलमं लावण्याचे सांगितले असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

राज ठाकरेंनी चिथावणीखोर भाषण दिले, त्यांचा उद्देश दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा होता. त्यांनी त्या द़ष्टीने भाषण केले होते. मला पोलिसांवर विश्वास आहे. त्यांनी योग्य कारवाई करायला हवी असे म्हटले आहे. कायदा जर सर्वांसाठी सारखा आहे, तर कोणत्याही राजकीय नेत्याने काही बोले तर त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल होणार हे आम्हाला समजले आहे. राज ठाकरेंवर 153 ऐवजी जर कलम 153 अ लावले असते, तर केस स्ट्राँग केस झाली असती. मनसेच्या सभेचा केवळ एकच उद्देश होता तो म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करायखची असा आरोप जलील यांनी केला आहे.

राज ठाकरे लोकांना प्रोत्साहित करत होते

अजान चालू झाली तेव्हा त्यांना आत्याच्या आता बंद करा, नाहीतर त्यांच्या तोडांत बोळा घाला असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. यासोबतच जर भोंगे बंद झाले नाहीतर एकदा होऊनच जाऊद्या असे म्हणत त्यांनी तरुणांची डोके भडकवण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई केली पाहिजे असे खासदार जलील यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...