आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Aurangabad Murder | Crime | Marathi News | The Body Of A Man And A Woman In An Offensive Position In A Car In Gandheli; Sounds Like An Explosion In A Car

घातपाताचा प्रकार आहे का?:गांधेलीत कारमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पुरुष, महिलेचा मृतदेह; कारमध्ये स्फोटासारखा आवाज

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कारमध्ये धूर निघाल्यानंतर परिसरात गुरे चारणाऱ्या तरुणाच्या नजरेस पडला प्रकार

गांधेली परिसरातील निर्जनस्थळी उभ्या कारमध्ये पुरुष व महिलेचा आक्षेपार्ह अवस्थेत मृतदेह आढळला. बुधवारी दुपारी तीन वाजता सहारा सिटीच्या मागील परिसरात ही घटना उघडकीस आली. दाेघांचा चेहरा व खांद्याखालील काही भाग जळाला. रोहिदास गंगाधर आहेर (४८, रा. जवाहरनगर), शालिनी सुखदेव बनसोडे (३८, रा. उल्कानगरी) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, कारमध्ये किराणा सामान, धान्य व भाजीपाल्यासह सिगारेट पेटवण्याचे लायटर सापडले. हा घातपाताचा प्रकार आहे का? याचा तपास पाेलिस करत आहेत.

बीड बायपासवरील सहारा सिटीच्या मागील बाजूची जागा निर्जन आहे. बुधवारी दुपारी २ वाजता काही गुराखी जनावरे घेऊन परिसरात फिरत असताना त्यांना अचानक स्फोटासारखा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता कारमधून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी हा प्रकार गावकऱ्यांना कळवला. चिकलठाणा पाेलिसांना माहिती मिळताच पाेलिस उपअधीक्षक जयदत्त भवर, निरीक्षक देविदास गात, सहायक निरीक्षक एस. एस. रोडगे घटनास्थळी पाेहाेचले. निर्जनस्थळी बाभळीच्या झाडांमध्ये पांढऱ्या रंगाची फाॅक्सवॅगन व्हेंटाे कार (एमएच २० डीजे ७२५९) उभी होती. त्यात आहेरसह महिला मागील सीटवर भाजलेल्या अवस्थेत पडलेले दिसले. रुग्णवाहिकेला पाचारण करून दोघांना घाटीत दाखल करण्यात आले. मात्र,तोपर्यंत त्यांच्या मृत्यू झालेला होता.

बांधकाम व्यावसायिकाकडे चालक म्हणून करत होते काम : पत्नीसह दोन विवाहित, तर एक अविवाहित मुलगी असलेले आहेर जवाहरनगर परिसरात राहत होते. त्यांच्या आधार कार्डवर उस्मानपुरा, दर्गा रस्त्यावरील पत्ता आहे. मूळ वैजापूरचे असलेले आहेर यांचे गावाकडे सायकल दुरुस्तीचे दुकान होते. २००४ मध्ये कुटुंबासह ते औरंगाबादला स्थायिक झाले व चालक म्हणून काम करू लागले. मागील सहा वर्षांपासून ते अथर्व कन्स्ट्रक्शनचे रवींद्र जैन यांच्याकडे चालक म्हणून कामाला होते, तर उल्कानगरीतील शालिनी घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. सकाळी ११ वाजता ती घराबाहेर पडली. नंतर घरी परतली नाही. त्यामुळे नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. रात्री नातेवाईक घाटीत आले. तेव्हा चिकलठाणा पोलिस या घटनेची कागदोपत्री प्रक्रिया पार पाडत होते. अपघात विभागात दोघांचे मृतदेह होते. तिचे नातेवाईक तेथे पोहोचताच पोलिसांनी त्यांना महिलेचा मृतदेह दाखवला व ओळख पटली.

ही असू शकतात कारणे

अपघाताच्या नेमक्या कारणाचा पोलिस तपास करत आहेत. मात्र, प्राथमिक पाहणीत दोघांचे चेहरे गंभीररीत्या भाजून मोठे फोड येऊन त्वचा निघाली होती. कारचे दरवाजे बंद हाेते, मात्र लॉक नव्हते. कार सर्व्हिसिंगतज्ज्ञांच्या मते, कार सुरू होती. एसी सुरू असल्याने एसीचा स्फोट झाला व त्याचा भडका दोघांच्या चेहऱ्यावर उडाल्याने ते गंभीररीत्या भाजले. शिवाय, कारच्या आत सुगंध कायम राहण्यासाठी परफ्यूम ठेवला जातो. एसी किंवा परफ्यूमच्या संपर्कात ज्वलनशील पदार्थ आल्यानंतर स्फोट होऊ शकतो.

हे प्रश्न अनुत्तरित
स्फोट झाला असला तरी दोघांचा चेहरा वगळता कारमधील कुठलाही भाग जळालेला नाही.
स्थानिकांच्या माहितीनुसार, स्फोटासारखा आवाज आला तरीही कारच्या आतून किंवा बाहेरून कुठेही तडे गेले नाहीत. काचाही सुस्थितीत हाेत्या. कारच्या दरवाजाजवळचा पेपर व रुफचा काहीसा भाग जळाला.

दुपारी १२ वाजता मालकाची कार घेऊन निघाले
बुधवारी सकाळी दहा वाजता आहेर जेवण करून कामावर जाण्यासाठी निघाले. दुचाकी खराब असल्याने ते चालत गेले. कामाच्या ठिकाणी पाेहाेचल्यानंतर १२ वाजता सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून जैन यांची कार घेऊन ते निघाले. मात्र, अडीच वाजूनही ते परतले नाहीत. ताेपर्यंत चिकलठाणा पोलिसांनी जैन यांना संपर्क साधला होता. तोपर्यंत आहेर कार घेऊन गेले व परतलेच नसल्याचे पत्नीला कळाले होते. दुपारी त्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, पाच वाजता पतीचा अपघात झाल्याचे कळाले. तशाच अवस्थेत त्यांनी मुलीसह घाटीकडे धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...