आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांकडून विचारणा सुरु; दहावीची परीक्षा न झाल्याने मेरिट कसे ठरवणार हा प्रश्न ?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दहावीच्या परीक्षा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला

दहावीची परीक्षा रद्द केल्याने आता विद्यार्थी आणि पालकांकडून सर आयटीआयचे प्रवेश कधीपासून सुरु होणार आहेत. याची विचारणा केली जात आहे. अजून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आले नसले तरी आयटीआयकडून तयारी सुरु झाली आहे. मात्र परीक्षा न झाल्याने आणि अद्याप निकाल कसा देणार याबद्दल स्पष्टता नसल्याने मेरिट कसे ठरवणार असा प्रश्न प्रवेशावेळी निर्माण होण्याची शक्यता आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामुळे आता रोजगारासह स्वयंरोजगाराच्या संधी असणाऱ्या आयटीआय औद्योगिकी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेविषयी विद्यार्थी आणि पालकांकडून विचार सुरु झाली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकावरही चर्चा सुरु असून, लवकरच वेळापत्रक जाहिर होण्याची देखील शक्यता आहे. मात्र परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण कसे करु शकता असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. तसेच राज्यमंडळाने परीक्षा रद्द केल्यावर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करणार? निकाल कसा देणार याचा विचार केलेला नाही. त्याबद्दल अजूनही स्पष्टता नाही. तर आयटीआयची प्रवेश प्रक्रिया केवळ ही मेरिटवर अवलंबून आहे. ज्यात गुणांकणाबरोबरच कास्ट-कॅटेगरीचा देखील विचार केला जातो. परंतु स्पष्टता नसल्याने आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणी येवू शकतात.

तसेच जर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर पुन्हा प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जावू शकते. असे आयटीआयमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत आयटीआयची प्रवेश प्रक्रिया चालली होती. तीन फेऱ्या आणि एक समुपदेशन फेरी असे होते. परंतु कोरोनामुळे लांबलेल्या वेळापत्रकात वारंवार बदल झाल्याने चार नियमित तर चार समुपदेशन फेऱ्या मागच्यावेळी झाल्या होत्या. औरंगाबाद आयटीआयमध्ये एकूण २९ ट्रेड असून, प्रवेश क्षमता ११६० आहे. ५३ युनिट आहेत.

बातम्या आणखी आहेत...