आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुली करणाऱ्या गुंडांना धडा शिकवणार:व्यापाऱ्यांवरील कारवाई मागे घ्यावी, अन्यथा मी दुकाने उघडायला लावीन : खासदार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दर आठवड्याला अधिकारी व लाेकप्रतिनिधींची आढावा बैठक हाेत असते.

लाॅकडाऊनच्या काळात प्रशासन माेठ्या व्यापाऱ्यांवर मेहेरबानी करत आहे तर छाेट्या व्यापाऱ्यांना मात्र दंड ठाेठावत आहे. शनिवारी गुलमंडीत मिलन मिठाई भांडारचे सील दोन तासांत काढण्यात आले, मात्र इतर गरीब व छोट्या व्यापाऱ्यांना दंड ठाेठावणे, दुकाने सील करण्याची बळजबरी का केली जात आहे. प्रशासनाने छाेट्या दुकानांचे सील उघडले नाही तर गरीब छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने मी स्वत: उघडायला येईल, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी दिला.

इम्तियाज म्हणाले, ‘छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानांचे सील काढण्याचे निवेदन आमदार प्रदीप जैस्वाल व मी जिल्हाधिकारी यांना दिले होते. परंतु काही राजकीय नेत्यांनी दुकान उघडण्यास विरोध केला. त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. बँकेचे हप्ते फेडू न शकल्याने एका रिक्षाचालकाने आत्महत्या केली आहे. ही गंभीर बाब आहे. खासगी बँका गुंडांकरवी कर्जाचे हप्ते बळजबरीने वसूल करू लागले आहेत. अशा रिकव्हरी एजंटांनी त्रास दिल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा, आम्ही त्यांचा बंदाेबस्त करु, असे आवाहनही त्यांनी व्यावसायिक वाहनचालक, मालकांना केले. या कर्जावरील व्याज माफ करावे, व्यापाऱ्यांचे लाइट बिल माफ करा आदी मागण्याही खासदारांनी केल्या आहेत.

आज आढावा बैठकीस जाणार नाही
दर आठवड्याला अधिकारी व लाेकप्रतिनिधींची आढावा बैठक हाेत असते. मात्र दुटप्पी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठ थाेपटण्यासाठी आता साेमवारच्या बैठकीत मी जाणार नाही. त्याएेवजी आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी रिक्षाचालकाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार असल्याचे खासदार इम्तियाज म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...