आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवसाआड पाण्याला बायपासचा अडथळा:औरंगाबादेतील 80 टक्के जलकुंभ एकदाच भरण्याची सुविधा; पाण्याचा दाबही वाढवता येत नाही

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्याचे प्रयत्न महापालिकेकडून केले जात असलेतरी ते सध्या तरी शक्य नसल्याचे समोर आले आहे. जीर्ण झालेल्या दोन्ही योजनांमधून दाबाने पाणी येऊ शकत नाही. त्यामुळे जलकुंभ भरण्याऐवजी पाईपलाईनला बायपासकरून पाणी पुरवठा करावा लागत आहे. 80 टक्के जलकुंभ एकदाच भरले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 56 दललि क्षमतेची आणि 100 दललि क्षमतेच्या दोन्ही योजना कार्यान्वित आहे. या दोन्ही योजनांची मुदत संपल्यामुळे त्या कालबाह्य झाल्या असून अत्यंत जीर्ण झाल्याने जागोजागी फुटत आहे. या दोन्ही योजनांमधून पाणी वहन करण्याची क्षमता देखील अत्यंत कमी झाली आहे. पाण्याचा दाब (प्रेशर) वाढविला तर पाईपलाईन कधी फुटेल हे सांगता येत नसल्यामुळे पाण्याचा दाबही वाढवता येत नाही. अशा परिस्थितीतही शहराचा पाणी पुरवठा पाच दिवसाआड सुरळीत ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून केला जात आहे.

दुसरे असे की शहरात जलकुंभाची संख्या 33 इतकी आहे. यातील बहुतांश जलकुंभ देखील जीर्ण झालेले आहेत. 33 जलकुंभात 66 दक्षलक्षलिटर पाणी साठविल्या जाते. एकदा हे जलकुंभ भरल्या गेले की त्यातून संबंधित भागाला पाणी पुरवठा केला जातो. त्यानंतर मात्र जलकुंभ भरण्यासाठी पाण्याचा दाब वाढवता येत नाही. 33 जलकुंभापैकी केवळ 8 जलकुंभ दुसर्‍यांदा भरता येतात. उर्वरीत जलकुंभ दुसर्‍यांदा भरता येत नाही. तरी देखील महापालिकेने संबंधित भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये, वेळापत्रकाप्रमाणे पाणी देता यावे यासाठी जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आणि जलकुंभातून संबंधित भागात पाणी पोहचविणारी पाईपलाईनला बायपास करून पाणी पुरवठा केला जात आहे. पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने संबंधित भागाला पाणी मिळत आहे. बायपास बंद करण्याचा प्रयत्न केला तर शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जीर्ण पाईपलाईन बदलण्यासाठी पर्यायांचा शोध

शहरातील जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी आणि अंतर्गत भागाला पाणी पोहचविणारी पाईपलाईन बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी जीर्ण पाईपलाईन बदलण्याकरिता पर्यायी उपाययोजना शोधण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

11 जलकुंभ मिळाले तरच बायपास बंद

नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरात सध्या 35 जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या 11 जलकुंभाचे काम प्रगतीपथावर असलेतरी हे काम अत्यंत संथगतिने सुरू आहे. मार्च किंवा एप्रिल 2023 मध्ये हे 11 जलकुंभ महापालिकेकडे हस्तांतरीत केले जाणार असल्याचे महाराष्ट्र जीवन हे प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. हे जलकुंभ मनपाला मिळालेतरच बायपास बंद करता येणार असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...