आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धा रत्नागिरीला:औरंगाबादच्या 31 सदस्यीय संघाची घोषणा, 12 ते 13 नोव्हेंबरला स्पर्धेचे आयोजन

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी जिल्ह्यातील श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, डेरवण येथे 12 व 13 नोव्हेंबरदरम्यान 22 व्या राज्यस्तरीय एरोबिक जिम्नास्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा 31 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. हा संघ शुक्रवारी स्पर्धेसाठी रवाना होईल.

स्पर्धेसाठी संघ उद्या रवाना

संघ प्रशिक्षक म्हणून राहुल श्रीरामवार व मनीष बट्टेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संघ व्यवस्थापक म्हणून दीपाली बजाज यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या स्पर्धेत पंच म्हणून अमेय जोशी, हर्षल मोगरे व इशा महाजन यांची राज्य संघटनेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. आदित्य जोशी हे स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहतील.

स्पर्धेसाठी दिल्या शुभेच्छा

जिल्हा संघाला या स्पर्धेकरिता महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. आदित्य जोशी, सचिव डॉ. मकरंद जोशी, भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभागाचे उपसंचालक नितीन जैस्वाल, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ. रणजित पवार, सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ. सागर कुलकर्णी, डॉ. विशाल देशपांडे, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, रोहित रोंगे, मनीष थट्टेकर, साईचे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे, क्रीडा मार्गदर्शक तनुजा गाढवे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

औरंगाबाद जिल्ह्याचा संघ पुढीलप्रमाणे :

वरिष्ठ गट : धैर्यशील देशमुख, साक्षी लड्डा, साक्षी डोंगरे, संदेश चिंतलवाड, सायली वझरकर, विजय इंगळे, उदय मधेकर, अभय उटवाल, आर्य शहा, स्मित शहा, गौरव जोगदंड, प्रेम बनकर.

कनिष्ठ गट : अद्वैत वझे, राधा सोनी, गौरी ब्रह्मने, अनिकेत चौधरी, विश्वेश पाठक, देवेश कातनेश्वकर, दीपक अर्जुन, पाणिनी देव, रामदेव बिराजदार.

पुरुष एकेरी : आर्यन फुले. महिला एकेरी रिया नाफडे. मिश्र दुहेरी : आर्यन फुले, पुष्टी अजमेरा. तिहेरी गीत भालसिंग, सानवी सौंदले, सिद्धी उपरे. ग्रुप गीत भालसिंग, सानवी सौंदले, रिया नाफडे, चिरंजीता भवलकर, अनुश्री गायकवाड.

नॅशनल डिप्लोमेंट पुरूष एकेरी : सूर्या सौंदले. महिला एकेरी अक्षया कलंत्री. मिश्र दुहेरी: अद्वैत काचेकर, अक्षया कलंत्री. तिहेरी अद्वैत काचेकर, अवंतिका सानप, श्वेता राऊत.

बातम्या आणखी आहेत...