आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत कहर:43 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 29 दिवसांचे बाळ, 6 महिन्यांची चिमुकली दगावली

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत १७०० पर्यंत गेलेली रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण दुपटीने वाढत चालले आहे. मंगळवारी दिवसभरात १११६ रुग्ण वाढले, तर तब्बल ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ही एका दिवसातील उच्चांकी मृत्यूसंख्या आहे. मृतांत कन्नड येथील २९ दिवसांचा चिमुकला व ६ महिन्यांची चिमुकली, ज्युबली पार्क येथील १४ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

मराठवाड्यात मंगळवारी ४०४६ नवे रुग्ण, ८४ जणांचा मृत्यू झाला. विभागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३९०९६ झाली. जालन्यात ४२४, परभणी ३७९, हिंगोली २२४, नांदेड ९५०, लातूर ३९३, उस्मानाबाद २४२ तर बीडमध्ये ३१८ नवे रुग्ण आढळले.

एकट्या नागपुरात ५४ मृत्यू
विदर्भात मंगळवारी कोरोनामुळे ८३ जणांचा मृत्यू, २५४३ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील ६१ जणांमध्ये नागपूरचे ५४ तर वर्धा ५, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पश्चिम विदर्भात २२ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी २४१८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. विदर्भातील एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७१,९५१ तर मृतांची संख्या ८,७६२ झाली.

बातम्या आणखी आहेत...