आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकी झाली महाग:औरंगाबादजवळ टँकर उलटला, जखमींना मदत राहिली दूर, नागरिकांची गोडेतेल नेण्यासाठी झुंबड

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे-सोलापूर महामार्गावरील आडूळजवळ (जि. औरंगाबाद) गोडेतेलाची वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली. मात्र, यावेळी अपघातग्रस्तांना मदत न करता तेल घेऊन जाण्यासाठी पंचक्रोशीतल्या नागरिकांची झुंबड उडाली.

विशेष म्हणजे अनेकांनी हा प्रकार मोबाइलमध्ये कैद केला. आता त्याचे फोटो व्हायरल झालेत. त्याची मोठ्या चवीने चर्चा सुरूय.

कसा घडला अपघात?

गोडेतेल घेऊन जाणारा टँकर औरंगाबादहून बीडकडे निघाला होता. आडूळ गावाजवळच्या वळणावर एका वाहनाने कट मारल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे हा टँकर रस्त्यातच उलटला. या अपघाताची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अवघी पंचक्रोशी उलटली

तेलाच्या टँकर उलटल्याची बातमी हां-हां म्हणता आडूळ, देवगाव, थापटी, रजापूरसह पंचक्रोशीत पसरली. तेव्हा नागरिकांनी तेल लंपास करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. सध्या गोडेतेलाचे भाव गगनाला भिडलेत. त्यात वाढती महागाई. हे पाहता लोकांनी फुकटचे तेल घेण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्याचे दिसले.

अन् लोकांची गर्दी

विशेष म्हणजे जखमींना मदत तर सोडाच कोणी विचारपूसही केली नाही. तांब्या, डबा, पाण्याचा जार, बादली, भांडे, पातेले हाताला लागेल ती वस्तू घेऊन अनेकांनी तेल नेण्यासाठी टँकरकडे धाव घेतली. शेवटी पोलिसांपर्यंत ही बातमी गेली. तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फुकट्यांची गर्दी पांगवली. अन् अपघातग्रस्तांना मदत केली.

बातम्या आणखी आहेत...