आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दुचाकीवरून पडलेल्या महिलेला ट्रकने चिरडले; धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवारातील घटना

आडूळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पांढरी शिवारात दुचाकीवरुन पडलेल्या महिलेला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी-पिंपळगाव येथे मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली असून महिला अंबडची रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय?

सय्यद कुटुंबीय हे अंबड तालुक्यातील नांदी गावातून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले होते. कासम हसन सय्यद (69) आणि त्यांची पत्नी आशाबी कासम सय्यद (65) यांच्यासह नातू दुचाकीवरुन रुग्णालयात जाण्यासाठी निघाले होते. आशाबी कासम सय्यद यांचा दुचाकीवरुन तोल गेला आणि त्या खाली पडल्या.

यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना चिरडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पांढरी, पिंपळगाव, आडूळ येथील नागरिकांनी मदतकार्य केले. ही घटना करमाड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

हिंगोलीत अपघातात पोलिस जमादाराचा मृत्यू

हिंगोली येथील बैठक आटोपून कळमनुरी येथे मिरवणुक बंदोबस्तावर जाणाऱ्या पोलिस जमादाराच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस जमादाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ता. 11 दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुरेश बळीराम बांगर (57) असे जमादाराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.