आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक चित्रपटाची कवाड खुली करणाऱ्या आठव्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला बुधवारी (11 जानेवारी) प्रोझोन माॅलमध्ये सुुरुवात होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या हस्ते होणार असून, समारोप जी-20 परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष संध्या पुरेचा करणार आहे. या 5 दिवसांमध्ये रसिकांना 55 चित्रपट पाहात येणार आहे.
महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, महोत्सवाचे अध्यक्ष अशोक राणे, एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ज्ञानेश झोटिंग, निलेश राऊत उपस्थित होते.
राऊत म्हणाले, गेली 8 वर्ष या चित्रपट महोत्सवाने शहरात कलासंस्कृतीचे निराळेच वलय निर्माण केले आहे. औरंगाबादकरांना जगाशी कनेक्ट करणारा हा महोत्सव आहे. कोविडमुळे दोन वर्ष खंड पडला असला तरीही महोत्सवाची नोंद राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर घेतली गेली आहे, ही बाब दिलासा देणारी आहे.
राणे म्हणाले, या महोत्सवात ‘सत्यजीत रे’ यांच्या कलाकृती आजच्या तरुणाईला अनुभवता येणार आहेत. चित्रपट पाहण्याची दृष्टी देणारा हा महोत्सव आहे. यंदा श्रीलंका आणि कॅनडा येथील निर्माते-दिग्दर्शकांनी स्वत: महोत्सवात सहभागी होण्यासाठी चित्रपट पाठवले आहेत, ही अपल्या यशाची पावती आहे.
कुलकर्णी म्हणाले, हा महोत्सव आयोजकांचा किंवा कुठल्या संस्थेचा नाही तर औरंगाबादकरांचा आहे. यामध्ये फ्रान्स, नेपाळ, बांगलादेश, पोर्तुगिज, कझागिस्तान, मोराक्को, कोरिया अशा विविध देशातील चित्रपट पाहता येतील. यातून संस्कृती आणि विचारधारेचे आदानप्रदान होते.
अरुण खोपकरांना जीवन गौरव पुरस्कार
यंदाच्या महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि समिक्षक अरुण खोपकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
कलावंतांची मांदियाळी
महोत्सवात सौमित्र किशोर कदम, दिग्दर्शक समीर पाटील, नितीन वैद्य, गिरिश मोहिते, उमेश कामत, सोनाली कुलकर्णी, श्वेता बसूप्रसाद, प्रतिमा जोशी, पुष्कर जोग हे कलावंत-दिग्दर्शकही महोत्सवात सहभागी होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.