आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामांतर:औरंगाबादच्या विमानतळाचे नामांतर तूर्तास नाही : केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव विमानतळाला देण्याचा प्रस्ताव

औरंगाबाद विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामांतर करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला ठराव, त्यास विधिमंडळाची मंजुरी आणि केंद्राला प्रस्ताव सादर करण्यास सव्वा वर्ष उलटले. मुख्यमंत्र्यांच्या पत्रालाही ६ महिने झाले. एवढे करूनही नामांतर कधी होणार हे सांगता येत नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. यामुळे तूर्तास तरी विमानतळाला महाराजांचे नाव देता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्यावरून राजकारण रंगत असताना औरंगाबाद विमानतळाचे नाव “छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याचा मुद्दा चर्चेत येतो. पाच मार्च २०२० रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी ठराव एकमताने मंजूर केला. नामांतराचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला. पण सव्वा वर्ष उलटल्यावरही हा मुद्या थंड बस्त्यात आहे. उर्वरित. पान ३

दोन प्रश्नांना ६ ओळींचेे उत्तर
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ५ ऑगस्ट रोजी लोकसभेत विमानतळाच्या नामांतराचा विचार आहे का? असेल तर त्याची स्थिती काय आहे? आणि कधीपर्यंत निर्णय होईल, असे प्रश्न विचारले. त्यावर नागरी उड्डाण राज्यमंत्री विजयकुमार सिंह म्हणाले, महाराष्ट्र सरकारकडून याबाबतचा प्रस्ताव आला आहे. मात्र, विविध विभाग आणि मंत्रालयांशी चर्चेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ याबाबतचा अंतिम निर्णय घेत असते. हा निर्णय अनेक विभागांशी संबंधित असल्याने नेमके कधी नामांतर होईल हे सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...